Shikha Malhotra : जगभरात 2020 चा तो कोरोना काळ अत्यंत वाईट होता. त्यावेळचे ते भयानक दृश्य कधीच विसरता येणार नाही, ज्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन उध्वस्त झाले. लाखो लोक मरण पावले. या परिस्थितीत सारेच हतबल झाले होते. काहीजण तर स्वत:हून मदतीसाठी धावले. जीवाची बाजी लावत त्यांनी लोकांची सेवा केली. असहाय्यांना मदत केली. शिखा मल्होत्राही त्यापैकीच एक. शिखाने कोरोना महामारीच्या काळात नर्स बनून लोकांची सेवा केली. यानंतर तिची काय अवस्था झाली याची कुणी कल्पनाही केली नसेल. (Shahrukh’s actress Shikha Malhotra did nursing Shocking Transformation of her After brain stroke paralysis)
ADVERTISEMENT
अभिनेत्रीने नर्स बनून रूग्णांची केली सेवा
शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात शिखा मल्होत्रा एका छोट्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटानंतर तिने 2020 मध्ये ‘कांचली’मधून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘कांचली’मध्ये तिच्यासोबत संजय मिश्रा मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्री होण्यापूर्वी शिखाने नर्सिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळेच देशात कोरोनाचं सावट पसरलेलं असताना तिने जनतेचा आधार बनण्याचा निर्णय घेतला.
वाचा : Mumbai Rain Alert : महाराष्ट्राला झोडपणार! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
तिने मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयात नर्स म्हणून लोकांची सेवा केली. यात तिचा जीवही जाऊ शकतो हे माहित असतानाही तिने जीवाची पर्वा केली नाही. पण नंतर, ज्याची भीती होती तेच घडलं. शिखा कोरोनाच्या विळख्यात सापडली. हळूहळू ती कोरोनातून बरी होत असताना तिला ब्रेन स्ट्रोक झाला. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ब्रेन स्ट्रोकनंतर तिला पॅरालिसिस झाला.ती या सर्व आजारांशी लढत असतानाच तिला स्ट्राइडचीही समस्या झाली. त्यामुळे तिचे वजन खूप वाढले होते.
वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले…
गंभीर आजारांशी अभिनेत्रीची यशस्वी लढाई.. अशी झाली पुन्हा फिट!
शिखा म्हणते, ‘जर एखाद्या व्यक्तीमध्ये जगण्याची हिंमत असेल आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल तर देव देखील मदत केल्याशिवाय राहत नाही.’ शिखा अगदी गंभीर समस्यांशी लढत होती. ती पुन्हा बरी होईल अशी तिला अपेक्षाही नव्हती. पण मग एक चमत्कार घडला. शिखाला जगायचं होतं आणि देवही तिच्या मदतीला धावला आणि तिचं म्हणणं ऐकलं.
वाचा : Lok Sabha : ‘इंडिया’ची महत्त्वाची बैठक! मोदी सरकारविरोधात आणणार अविश्वास प्रस्ताव
शिखा हळूहळू आजारातून बरी होत आहे. आता ती नेहमीप्रमाणेच फिट आहे. ती पूर्वीपेक्षा अधिक ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. तिचे बिकिनी फोटो आश्चर्यचकित करणारे आहेत. मात्र, अभिनेत्रीसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ज्याप्रकारे तिने आजारांवर मात केली तसाच तिने तिच्या शरीराचं आणि लुकचं कायापालट केलं आहे. तिचा हा प्रवास आणि लढण्याची हिंमत प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे.
ADVERTISEMENT