देशात कोरोनाचे रूग्णांचा आकडा वाढतोय. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अभिनेता आर.माधवनला देखील कोरोना झाला होता. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर माधवनने सोशल मीडियावर ३ इडियट्स सिनेमाचा संदर्भ देत एक गमतीशीर पोस्ट केली होती. तर आता या पोस्टवर अभिनेता शरमन जोशीने उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
आर माधवन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला होता, “फरहानला नेहमीच रँचोला फॉलो करायचं होते. आणि व्हायरस नेहमीच आमच्यामागे होता. परंतु यावेळी त्याने आम्हाला पकडलंच. पण ALL IS WELL आणि मी लवकरच कोरोनातून बरा होईन. शिवाय, ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी आम्ही राजूला येऊ देणार नाही. तुमच्या दिलेल्या प्रेमाचे मी आभार मानतो. मी आता बरा होतोय.”
तर “मला आशा आहे की मी तुमच्या क्लबमध्ये सामील होणार नाही… पण मॅडी तू छान लिहिलं आहेस. फनी आहे”, असं भन्नाट ट्विट शरमन जोशीने केलं आहे. तर माधवनेही या ट्विटला उत्तर देत शरमनला काळजी घेण्यास सांगितलंय. 3 इडियट्स सिनेमामध्ये शरमन जोशी, आर माधवन आणि आमिर खान यांचा ट्रियो पहायला मिळाला होता.
कोरोनाचा कहर पुन्हा एकदा दिसू लागलाय. काल क्रिकेटर सचिन तेंडुलकरला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर मिलिंद सोमण, मनोज वाजपेयी, सिद्धार्थ चतुर्वेदी तसंच परेश रावल या बॉलिवूड कलाकारांनाही कोरोना झालाय.
ADVERTISEMENT