सध्या अभिनय क्षेत्रात सेलिब्रिटींपेक्षा स्टार किड्सचीच अधिक चर्चा होत असल्याचं समोर आलं. मराठी सृष्टीत देखील विराजस कुलकर्णी, अभिनय बेर्डे तसंच स्वानंदी टिकेकर या स्टारकिड्सनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तर आता मराठी क्षेत्रात अजून एक स्टारकिड डेब्यू करण्यासाठी तयार आहे.
ADVERTISEMENT
मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच मराठी मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणार आहे. सोहम बांदेकर ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम याची ही पहिलीच मालिका असल्याने प्रेक्षकांसमोर येणार आहे.
पोलीसी चातुर्य आणि साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्याक गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ‘नवे लक्ष्य’ कथामालिका असेल. ‘नवे लक्ष्य’ हा मनोरंजनाच्या ठेव्यातील नवाकोरा अध्याय असेल. पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून आपल्या भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट 9 ची टीम सज्ज झाली आहे.
स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.
ADVERTISEMENT