'काही लोकं BMW मध्येही स्ट्रगल करतात, माझ्याकडे तर..', शाहिद कपूरने का मारला स्टार किड्सना टोमणा?

अभिनेता शाहिद कपूर याने त्याच्या संघर्षाबाबत बरंच काही सांगितलं आहे. यावेळी त्याने स्टार किड्सना एक टोमणा देखील मारला आहे.

शाहिद कपूरचा स्टार किड्सना टोमणा (Photo: Instagram/Shahid Kapoor)

शाहिद कपूरचा स्टार किड्सना टोमणा (Photo: Instagram/Shahid Kapoor)

मुंबई तक

26 Jan 2025 (अपडेटेड: 26 Jan 2025, 04:35 PM)

follow google news

Shahid Kapoor: मुंबई: शाहिद कपूर हा आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. शाहिदचे वडील पंकज कपूर हे देखील इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तरीही शाहिदला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या. त्याला प्रसिद्धी आणि नाव सहजासहजी मिळाले नाही.

हे वाचलं का?

भाड्याच्या घरात राहत होता शाहिद

खरंतर, शाहिद फक्त 3 वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. शाहिदचे संगोपन त्याची आई नीलिमा अझीम यांनी केले. शाहिदला बालपणी खूप त्रास सहन करावा लागला. एके ठिकाणी त्याला भाड्याच्या घरात राहावे लागले. आता वर्षानुवर्षे शाहिदने त्याच्या आयुष्याशी संबंधित कधीही 'न कोणाला न सांगितलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

हे ही वाचा>> Malaika Arora: मलायका आणि मैत्रिणींचा विषयच हार्ड ना भाऊ, फोटो पाहून तुम्हीही...

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या संघर्षांबद्दल बोलताना शाहिद म्हणाला - 'माझे वडील एक कॅरेक्टर अभिनेते आहेत आणि माझी आई वयाच्या 15 व्या वर्षापासून कथक नृत्यांगना आहे. मी भाड्याच्या घरात राहिलो आहे. मी अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कोणतंही विशेष बाब म्हणून कधी मिळाली नाही.'

हिरो बनण्यासाठी शाहिदने केली प्रचंड मेहनत

शाहिद पुढे म्हणाला- 'माझ्या संपूर्ण आयुष्यात, माझ्या परिस्थितीमुळे मला बळी पडल्यासारखे वाटले. पण काही लोकांना BMW मध्ये अडचणी (स्ट्रगल) येतात. ते देशातील टॉप 2-3 दिग्दर्शकांसह आपला प्रवास सुरू करतात. पण मी 250 ऑडिशन्स देऊन आलो आहे. माझ्या परिस्थितीने मला कधीही साथ दिली नाही.'

हे ही वाचा>> अमिषा पटेल सलमानशी लग्न करणार? म्हणाली, 'मी तर तेव्हापासून फक्त...'

शाहिदने असेही सांगितले की, आता त्याच्या फॅशन सेन्सचे खूप कौतुक केले जाते. 'आज लोक म्हणतात की शाहिदचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. पण मला अशा गोष्टींवर हसू येते, कारण मला तो काळ आठवतो जेव्हा माझ्याकडे लोखंडवाला येथून कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते.'

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहिद लवकरच 'देवा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 'देवा'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत. 'देवा' हा चित्रपट 31 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

    follow whatsapp