ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने १३ मे रोजी तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने तिच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती.
सनी लिओनीने बर्थडे सेलिब्रेशन पार्टीतील अनेक फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केली आहेत. या पार्टीत बहुतांश सेलिब्रिटी काळ्या रंगाची वेशभूषा करून आलेले होते.
सनी लिओनी वाढदिवसाच्या पार्टीत खूपच सुंदर होती. सनीने ब्लॅक शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला होता.
बर्थडे पार्टीत सनी लिओनी केक कापताना दिसत आहे. यावेळी तिचा पती डॅनियलही तिच्यासोबत होता.
सनी लिओनीने वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या जवळच्या मित्रांना बोलवलेलं होतं. त्यांच्यासोबतचे फोटो सनीने शेअर केले आहेत.
पार्टीत सनी लिओनी जवळच्या माणसांसोबत सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसली.
सनी लिओनीच्या पार्टीत डब्बू रतनानी त्याच्या पत्नीसोबत आला होता. रिआलिटी शो क्वीन दिव्या अग्रवालही सनी लिओनी सोबत पार्टी एन्जॉय करताना दिसली.
डॅनियल वेबरने पार्टी आयोजित करून सनी लिओनीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवला. या पार्टीत सनी लिओनीही आपल्या पतीवर प्रेम व्यक्त करताना दिसली.
पार्टी दरम्यान सनी लिओनी डॅनियल वेबरला किस करताना दिसत आहे.
दुसऱ्या एका फोटो सनी लिओनी डॅनियल वेबरला लिप लॉक करताना दिसत आहे. दोघांमधील रोमान्सचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत.
या पार्टीत सनी लिओनी आणि डॅनियल वेबर रोमँटिक अंदाजात दिसले. हे फोटो शेअर करताना सनी लिओनीने पतीचे पार्टी आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
(Photo Credit: Sunny Leone Instagram)
ADVERTISEMENT