सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी चाहत्यांशी कनेक्टेड असतात. त्याचप्रमाणे मराठमोळा अभिनेता सुयश टिळकही सोशल मिडीयावर बराच अक्टिव्ह असतो. मात्र आता अचानक सुयशने सोशल मिडीयाला रामराम ठोकणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. मात्र सुयश सोशल मिडीया का सोडतोय याबाबत अजून त्याने खुलासा केला नाही.
ADVERTISEMENT
सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून खलील जीब्रानची एक पोस्ट शेअर केलीये. याला कॅप्शन देताना गुड बाय सोशल मिडीया असं म्हटलंय. इतकंच नाही तर त्याने ‘Offline is the new luxury’ असा मॅसेज शेअर केला आहे. सुयशच्या या स्टोरी आणि पोस्टमुळे त्याचे चाहते मात्र पुरते हैराण झाले आहेत.
सोशल मिडीयातून ब्रेक घेणारा किंवा सोशल मिडीयाला गुडबाय करणारा सुयश काही एकटा अभिनेता नव्हे. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीया सोडलंय. बॉलिवूडमध्येही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आयुष शर्मा यांनीही विविध आरोपांमुळे सोशल मिडीया सोडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान सुयश टिळक सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत भूमिका साकारतोय. शिवाय नुकत्याच खालीपिली या सिनेमामध्येही झळकला होता. तसंच का रे दुरावा आणि पुढचं पाऊल या मालिकांमध्येही त्याची महत्त्वाची भूमिका होती.
ADVERTISEMENT