तापसी म्हणते, ….तर मी शिक्षा भोगण्यासाठी तयार

मुंबई तक

• 03:07 PM • 08 Mar 2021

गेल्या बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली. यानंतर तापसीने ट्विट करत इन्कम टॅक्सच्या या छापेमारीवर नाराजीही व्यक्त केली होती. तर नुकतंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोषी आढळल्यास दिलेली शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं तापसीने सांगितलंय. तापसी म्हणते, “इन्कम टॅक्स विभागाने का घरावर छापा टाकला याबाबत मला काही माहिती नाही. […]

Mumbaitak
follow google news

गेल्या बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली. यानंतर तापसीने ट्विट करत इन्कम टॅक्सच्या या छापेमारीवर नाराजीही व्यक्त केली होती. तर नुकतंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोषी आढळल्यास दिलेली शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं तापसीने सांगितलंय.

हे वाचलं का?

तापसी म्हणते, “इन्कम टॅक्स विभागाने का घरावर छापा टाकला याबाबत मला काही माहिती नाही. तसंच जर मी काहीही चुकीचं केलं असेन तर ते समोर येईल. जर या प्रकरणात मी दोषी आढळली तर मला शिक्षाही होईलच. आणि ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे.”

मुलाखतीत तापसी पुढे म्हणाली, यादरम्यान कारवाईच्या वेळी मी अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलंय. त्यांना हव्या त्या प्रश्नांची उत्तरंही दिलीयेत. त्यांनी त्यांचं काम केलं आणि ते निघून गेलेत. कायद्यानुसार ही प्रकिया पार पडत असेल तर सहकार्य करण्यात काहीही गैर नाही, असा विचार करून मी या कारवाईला सामोरे गेले.

इन्कम टॅक्स रेडनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

बुधवारी इन्कम टॅक्स विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर छापेमारी केली. फॅंटम फिल्मच्या टॅक्स चोरी संदर्भात ही कारवाई करण्यात आली. गेले तीन दिवस अनुराग आणि तापसी यांची इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली.

    follow whatsapp