कोरोनाचा पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. मास्क लावा असं सांगूनही लोकं ऐकत नाहीयेत. शेवटी तात्या विंचू यानेच आता थेट लोकांना धोक्याचा इशारा दिलाय. कोरोना पुन्हा एकदा वाढतोय त्यामुळे पार्टी करू नका असं तात्या विंचूने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजित पाध्ये यांचा तात्या विंचू हा बाहुला फार फेमस आहे. तात्या विंचूच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यास सुरु केली आहे. यावर तात्याविंचूचा एक व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सध्या ‘पावरी हो रही है’ हा व्हीडियो प्रचंड गाजतोय. या ट्रेन्डवरून अनेकजणांनी पावरी हो रही है असे पार्टी करतानाचे व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केलेत. याच मुद्द्यावरून तात्या विंचू पार्टी करणाऱ्या लोकांना सुनावलं आहे. व्हीडियोमध्ये तात्या विंचू म्हणतो, “नमस्कार मी तात्या विंचू, ये हमारी पावरी हो रही है. पार्टी कसली करता इथे कोरोनाच्या केसेस वाढतायत. वॅक्सिन आलं तरी पार्टी करुन गर्दी करु नका. नाहीतर कोरोनाचा आत्मा तुमच्यात आणि तुमचा आत्मा बाहेर. ओम फट स्वाहा”
यापूर्वी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाध्ये कुटुंबियांनी तात्या विंचूद्वारे समाजात जनजागृत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. महेश कोठारे यांच्या झपाटलेल्या या सिनेमातून तात्या विंचू हा बाहुला प्रचंड लोकप्रिय झाला.
ADVERTISEMENT