अभिनेत्री सायली संजीवचा आगामी चित्रपट बस्ता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. 3 एप्रिल 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आलाय.
ADVERTISEMENT
या चित्रपटाची कथा एका मुलीच्या लग्नसोहळ्या भोवती फिरताना दिसते. वडील आणि मुलीचं नातं तसंच मुलीच्या लग्नासाठी शेतकरी वडिलांची सुरु असलेली धडपड या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. यामध्ये स्वाती या मुलीचं लग्न असून सायलीने ही भूमिका साकारली आहे. तर स्वातीच्या वडिलांच्या भूमिकेत सुहास पणशीकर दिसणार आहेत.
आपली मुलगी सासरी सुखी राहावी यासाठी मुलाच्या मंडळींचा हट्ट वडील पुरवत असतात. लग्नाची बोलणी झाल्यावर लग्नाच्या कामाची सुरुवात बस्ता बांधण्यापासून होते. आणि याच बस्त्यासाठी येणाऱ्या अडचणी तसंच त्या कुटुंबाची होणारी धडपड या सिनेमाद्वारे दाखवण्यात आलीये. या सिनेमामध्ये सायली संजीव हिच्या सोबत शुभांगी गोखले, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, पार्थ भालेराव, पल्लवी पाटील, भारत गणेशपुरे आणि सुबोध भावेही दिसणार आहे.
सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, तानाजी घाडगे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. सायलीला पाहता तिचा हा ‘बस्ता’ नेमका कसा असेल यांची उत्सुकता लागलीये.
ADVERTISEMENT