मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील क्यूट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील कोरोनाची लागण झाली होती. अभिनेता उमेश कामत याने स्वतः सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. त्यानंतर दोघांनाही लवकर बरं वाटावं यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. दरम्यान उमेशने आता दोघांच्याही तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
उमेशने इन्स्टाग्रावर प्रिया आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उमेश म्हणतो, “तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत. तुमच्या सदिच्छा आम्हाला लवकर बरं करण्यासाठी मदत करतायत.. आमच्या दोघांच्या तब्येतीत सुधारणा होतेय. गणपती बाप्पा मोरया.”
काही दिवसांपूर्वी प्रिया बापटने देखील सर्वांचे आभार मानले होते. प्रियाने तिचा आणि उमेशचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी प्रियाने, “चांगल्या आणि वाईट काळात नेहमी सोबत राहणार. इतकं प्रेम आणि सदिच्छा दिल्याबद्दल तुमच्या सर्वांची मी आभारी आहे. आमच्या दोघांच्या तब्येतील सुधारणा होतेय. असंच प्रेम देत रहा.”
17 मार्च रोजी उमेशने त्याला आणि प्रियाला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोघांनीही स्वतःला घरी क्वारंटाईन केलं होतं. दरम्यान कोरोनाची लागण होण्यापूर्वी प्रिया आणि उमेशने बेव सिरीजच्या शूटींगला सुरुवात केली होती. ‘…आणि काय हवं’ या बेव सिरीजच्या तिसऱ्या सिजनचं शूटींग सुरु झालं होतं.
ADVERTISEMENT