ADVERTISEMENT
ब्युटी क्वीन आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अलिकडेच इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली.
यावेळी उर्वशीने बेंजामिन नेत्यान्याहू यांना खास भेट दिली. हिंदूंना पवित्र असलेली भगवदगीता उर्वशीने नेत्यान्याहूंना भेट दिली.
उर्वशी रौतेलाने ही भेट देतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘मला व माझ्या कुटुंबाला आमंत्रित करण्यासाठी इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे खूप खूप आभार,’ असं उर्वशीने म्हटलं आहे.
याचबरोबर ‘माझी भगवदगीता : जेव्हा योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणावर मनापासून एखादी भेट दिली जाते आणि त्याबदल्यात कुठलीही अपेक्षा ठेवली जात नाही, तेव्हा ती भेट नेहमीच पवित्र असते,’ असंही उर्वशीने म्हटलं आहे.
या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना आपापल्या देशांची राष्ट्रीय भाषाही शिकवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT