पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? रिहानाचा धर्म कोणता? ही तीच पॉप स्टार रिहाना आहे, जीने काल शेतकरी आंदोलनासंदर्भातली बातमी शेअर केली होती. त्यानंतर रिहानाचा धर्म शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. भारतातून गुगलवर सध्या ही एक गोष्ट मोठ्यामाणावर सर्च होतेय.
ADVERTISEMENT
पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटमुळे चांगला गदारोळ माजवला. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. तिच्या या ट्विटनंतर रिहानावर टिकाही झाल्या. या सर्व गोष्टींनंतर रिहाना ट्रेंडमध्येही आसी. रिहाना आणि तिच्याबद्दलची माहिती लोकं गूगलवर सर्चही करत आहेत.
रिहाना मुसलमान आहे का असं लोक अधिकतर सर्च करतातय. गुगल ट्रेन्ड्सनुसार Rihanna Muslim आणि Rihanna Religion हे जास्तीत जास्त सर्च केल्याचं समोर आलंय. हे भारताच्या सर्च ट्रेंड्स आहेत. तर रिहानाला सर्वात जास्त पंजाबमध्ये गूगलवर सर्च केलं जातंय.कोण आहे रिहाना?
रिहानाचं पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी असं आहे. ती एक बारबेडिअन पॉपस्टार, मॉडल आहे. 2005 मध्ये, रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम, म्युझिक ऑफ द सन लाँच केला होता. रिहानाच्या गाण्यांना तिचे चाहते उदंड प्रतिसाद देतात. भारतात देखील रिहानाने भरपूर चाहते आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकारात 32 वर्षीय रिहानाचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल 90 मिलियनहून अधिक फोलोवर्स आहेत.
कोण आहे रिहाना?

रिहानाच्या शेतकऱ्यांच्या ट्विटनंतर तिच्या फॉलोवर्समध्येही वाढ झालीये. तिचे 1 मिलियन फॉलोवर्स वाढले आहेत. ट्विटपूर्वी रिहानाचे 100 मिलियन फॉलोअर्स होते, तर ट्विटनंतर ही संख्या आता वाढून 101 मिलियन्स झाली आहे.
रिहानाने भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलं. तिने ट्विटरवर एक बातमी शेअर करत यामध्ये शेतकरी आंदोलनामुळे इंटरनेट सेवा बाधित झाल्याचा उल्लेख आहे. तसंच शेतकरी आंदोलनामुळे हरयाणाच्या अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा कशी बंद करण्यात आलीये, याची माहितीही या बातमीत देण्यात आलीये. याच बातमीवरून रिहानाला भारतातल्या शेतकरी आंदोलनाची माहिती झाली. त्यानंतर तिने हीच बातमी ट्विटरवर शेअर करून लिहिलं, ‘आम्ही याविषयी बोलत का नाही.’ तिने आपल्या ट्विटसोबत #FarmersProtest असा हॅशटॅगही वापरलाय.
ADVERTISEMENT