मुंबई: Bollywood अभिनेत्री आणि राजकीय नेते यांचं नाव बऱ्याच वेळा जोडलं गेलंय. अभिनेत्रींचं राजकीय नेत्यांशी लग्न होणं हेदेखील आपण पाहिलं आहे. सध्या अशीच एक चर्चा सुरु आहे. एक अभिनेत्री आणि एक राजकीय नेता यांच्या नावाची. ती नावं म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा. (who is raghav chadha with whom actress parineeti chopras name is being linked)
ADVERTISEMENT
परिणिती सेलिब्रिटी असल्यानं आपण सगळे तिला ओळखतो, तिचं काम आपण पडद्यावर पाहिलंय. पण, ज्या खासदारासोबत तिचं नाव जोडलं जातंय ते राघव चढ्ढा कोण आहेत हेच आपण जाणून घेऊया….
कोण आहेत राघव चड्ढा?
2011 मध्ये दिल्लीत सुरु असलेल्या लोकपाल आंदोलनावेळी राघव चड्ढा अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले. केजरीवालांनी आंदोलनातून राजकारणात एन्ट्री केल्यावर राघव चड्ढा देखील त्यांच्या सोबतीने राजकारणात सक्रीय झाले. अशाप्रकारे राघव चड्ढा आम आदमी पार्टीसोबत जोडले गेले. त्यानंतर राघव चड्ढा राज्यसभा खासदार झाले.
अधिक वाचा- AAP : राघव चढ्ढा-परिणीती चोप्राची लग्न जमलं? आप खासदाराने दिल्या शुभेच्छा
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी उच्चशिक्षण घेतलंय. दिल्ली विश्व विद्यालयातून त्यांनी B.com ची पदवी घेतलीये तर London School of economics मधून त्यांनी CA चं शिक्षण पूर्ण केलं. केजरीवालांसोबत राजकारणात entry केल्यानंतर 2013मध्ये आम आदमी पार्टीच्या drafting committee चा ते एक भाग होते. राघव चड्डा आम आदमी पार्टीचे सगळ्यात तरुण राष्ट्रीय प्रवक्तादेखील आहेत. तसेच पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकरीणीचे ते सदस्यही आहेत.
अधिक वाचा- मी बॉलिवूड सोडणार होते, कारण…; प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ
यासोबतच ते पार्टीच्या राष्ट्रीय कोशाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. भारतातील सगळ्यात तरुण खासदार म्हणून ओळखले जाणारे राघव चढ्ढा आता बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत दिसल्यामुळे चर्चेत आले आहेत. जेव्हा त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी ‘राजकारणावर प्रश्न विचारा.. परिणिती वर नाही.’ असं उत्तर दिलं.
दरम्यान, आम आदमी पार्टीचेच राज्यसभेचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्वीट करत राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा या दोघांना शुभेच्छा दिल्या. आरोरांनी केलेल्या या ट्वीटमुळे परिणिती आणि राघव यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या असल्या तरी यासंदर्भात परिणिती किंवा राघव चड्ढा यांच्याकडून ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही.
अधिक वाचा- मॉडेल जिममध्ये करायची एकच काम, जिम मालकाने थेट काढलं बाहेर!
मिळालेल्या माहितीनुसार London school of economics मध्ये परिणिती आणि राघव दोघांनी सोबत शिक्षण घेतलं होतं. Times of India च्या रिपोर्टनुसार परिणिती आणि राघव दोघांच्या घरच्यांनीही लग्नाची बोलणी सुरु केली आहे. मार्च महिन्यात राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा हे दोघं सोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये जेवताना दिसले होते आणि तेव्हापासूनच त्यांच्या डेटींग आणि लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. आता या संदर्भात परिणिती चोप्रा किंवा राघव चड्ढा कधी बोलणार याकडे मात्र त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
ADVERTISEMENT