बिग बॉस सिझन 14चा आज ग्रँड फिनाले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन कोण जिंकणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे. विजेता कोण होणार याबाबत सोशल मीडियावरही भरपूर चर्चा सुरु आहे. अखेर आज बिग बॉस 14 विजेता ठरणार आहे.
ADVERTISEMENT
रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला, अली गोनी, राखी सावंत तसंच राहुल वैद्य हे पाच जण फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे यापैकी एक आज रात्री 14 व्या सिझनचा बिग बॉस ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल वैद्य आणि रुबिना दिलैक या दोघांमध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळतोय. या दोघांपैकी कोणीतरी एक बाजी मारणार अशी मतं सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येतायत.
दरम्यान राखी सावंतही हा शो जिंकण्याची चिन्ह दिसतायत. राखी सावंतच्या एन्ट्रीनंतरच बिग बॉस शोच्या टीआरपीमध्ये बरीच वाढ झाली. राखी येण्यापूर्वी शोचा टीआरपी फक्त 1.1 असायचा पण तिच्या एन्ट्रीनंतर या शोचा टीआरपी 1.9 च्या वर गेलाय.
यंदाच्या सिझनचा ग्रँड फिनाले भव्य होणार आहे. या फिनालेसाठी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, रितेश देशमुख आणि नोरा फतेही खास गेस्ट म्हणून दिसणार आहेत. शिवाय या सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दिक्षित सहभागी होणार आहे.
ADVERTISEMENT