Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांची LOVE LIFE चमकणार! पण काही राशींना मिळेल धोका

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 07:00 AM)

21 October 2024, Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. ग्रह प्रत्येक राशीचा स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं.

ज्योतिषशास्त्रावर प्रेम करा:

प्रेम यशासाठी देवी सीतेची उपासना करणे उत्तम. यासाठी 21 दिवस प्रेम यशासाठी देवी सीतेची पूजा करणे उत्तम आहे. त्यासाठी २१ दिवस पूजा करावी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ सुधारेल?

point

काही राशींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ

point

वाचा तुमचं आजचं राशी भविष्य

22 October 2024, Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. ग्रह प्रत्येक राशीचा स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. आज 22 ऑक्टोबरला मंगळवार आहे. सनातन धर्मात मंगळवारी हनुमान देवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व समस्या दूर होतात. 22 ऑक्टोबरचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे आणि कोणत्या राशींना या दिवशी सावध राहावं लागेल, याबाबत वाचा सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

मेष राशी

आज मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नवी कार्याला सुरुवात करू शकता. संपत्तीबाबतचे वादविवाद मिटतील. लव्ह लाईफमध्ये रोमांचक मोड येतील.

वृषभ राशी 

आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक सुवर्ण संधी आहेत. आज प्रिय व्यक्तींसोबत बाहेर फिरण्यासाठी चांगला दिवस आहे. संपत्ती खदेरी करण्यासाठी शुभ दिवस आहे. लव्ह लाईफमध्ये आनंदाचं वातावरण राहिल. 

मिथुन राशी

मिथुन राशीचे लोक सामाजिक कार्यात सहभागी होतील. कुटंबासोबत पिकनिकला जाण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक वृद्धी होऊ शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळू शकतं. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेविरोधात बँक कर्मचाऱ्यांचं 'या' तारखेला आंदोलन! नेमकं कारण काय?

कर्क राशी

आज कर्क राशीच्या लोकोंचं खूप व्यस्त शेड्युल असणार आहे. कामकाजाची जबाबदारी वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. काही समस्या सोडवण्यासाठी जवळच्या मित्रांची मदत घेऊ शकता.

सिंह राशी 

सिंह राशीच्या लोकांचं कार्यलयात कौतुक होईल. प्रिय व्यक्तींसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. कुटुंबाच्या व्यक्तींकडून दुखद बातमी मिळू शकते. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गूंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच असणार आहे. आर्थिक लाभ होईल. पार्टनरचा सपोर्ट मिळेल. करिअरमध्ये आलेल्या समस्या समाप्त होतील. जीवनात आनंदाचं वातावरण निर्माण होईल.

तुळा राशी

आज ज्या लोकांना आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल, ते नवीन संधी शोधू शकतात. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. पैशांचा व्यवहार करताना सावध राहा. आर्थिक गोष्टींमध्ये कुणावर विश्वास ठेवू नका.

वृश्चिक राशी

आज वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कार्यालयात मान-सन्मान वाढू शकतो. तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. लव्ह लाईफ आणि आर्थिक गोष्टीत नशीबवान राहाल. घरात आनंदाचं वातावरण राहील.

हे ही वाचा >> Govt Job : NTPC मध्ये सरकारी नोकरीची संधी! 'एवढा' मिळणार पगार 

धनु राशी 

आज आर्थिक गोष्टींमध्ये फायदा होईल. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध होतील. कार्यलयात सहकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळेल. महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा.

मकर राशी

आजचा दिवस आर्थिक गोष्टींसाठी चांगला राहील. लाईफ पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. कुटुंबात महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा होईल. तुमचं आरोग्य उत्तम राहील.

कुंभ राशी

आज कुंभ राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेक कामांमध्ये सकारात्मक रिझल्ट मिळेल. प्रवासाचा योग असेल. कामकाजात आलेल्या समस्या दूर होतील.

मीन राशी

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी आनंदाचा ठरणार आहे. घरात उत्साहाचं वातावरण राहील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नवीन किंवा वाहनाची खरेदी करू शकता.

टीप - सूत्रांच्या माहितीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं आहे. य राशी भविष्यात दिलेल्या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.

    follow whatsapp