Govt Job : NTPC मध्ये सरकारी नोकरीची संधी! 'एवढा' मिळणार पगार 

Recruitment in NTPC 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

• 04:02 PM • 21 Oct 2024

follow google news

Recruitment in NTPC 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Biomass) या पदावर एकूण 50 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. (Govt Job opportunity 2024 in NTPC Interested candidates can apply now these is the last date know education qualification)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, B.SC (Agriculture Science) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Vidhansabha Election : शिवसेना ठाकरे गटात मुंबईच्या जागांवरून उलथापालथ! 'या' बड्या नेत्यांनी मातोश्रीवर घेतली धाव

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जात आहे. 

तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाहीये.

अधिक माहितीसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://ntpc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Gold Price : दिवाळीला निघणार दिवाळं! 1 तोळा सोन्याचे भाव 80 हजार पार? 

अर्जाची लिंक

https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1fZACTCHrY3YMLlKdmGfpvlP_oh3BlfjX/view?usp=sharing

    follow whatsapp