Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे म्हणजेच नोव्हेंबरपर्यंतचे 7500 जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूका लागणार असल्यानेच सरकारने नोव्हेंबरचा निधी महिलांच्या खात्यात ऑक्टोंबरमध्ये जमा केला होता. त्यामुळे महिला आता डिसेंबरच्या निधीच्या वाट पाहतायत. अशात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागू झाली आहे. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना बंद होईल? अशी चर्चा सूरू झाली आहे. त्यामुळे या चर्चेत किती तथ्य आहे? आणि महिला व बालविकास विभाग यावर नेमकं काय म्हणाले आहे? हे जाणून घ्या. (ladki bahin yojana continue or be closed aditi tatkare share important information mukhymantri majhi ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
खरं तर राज्यात विधानसभा निवडणूक लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. आणि योजनेच अर्ज नोंदणी देखील बंद करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर लाडकी बहीण योजना ही सूरूच राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले होते.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला स्थगिती नाहीच...डिसेंबरपर्यंत 1500 खात्यात येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे, अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली होती.
डिसेंबरचा निधी कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आतापर्यंत नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत. जुलै आणि नोव्हेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे 7500 जमा झाले होते. त्यानंतर आता महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार कधी? असा प्रश्न पडता होता. याचे उत्तर देखील आदिती तटकरे यांनी दिले आहे. सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! पुन्हा कधी मिळणार 1500 रुपये? 'ही' माहिती एकदा वाचा
2 कोटी महिलांनी घेतला लाभ
लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांनी घेतला आहे. या महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा झाले आहेत. अशाप्रकारे या महिलांना पाच महिन्याचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे एकूण मिळून महिलांना 7500 रूपये मिळाले आहेत. आता महिलांना डिसेंबरचे पैसै मिळणार आहेत. हे पैसे डिसेंबरमध्येच मिळणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT