Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला स्थगिती नाहीच...डिसेंबरपर्यंत 1500 खात्यात येणार

मुंबई तक

21 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 03:02 PM)

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लागणार असल्याच्या वृत्तानंतर इंडिया टुडेने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी बातचित केली होती.

ladki bahin yojana scheme model code of conduct election commision of india maharashtra assembly election 2024 aditi tatkare

लाडकी बहीण योजना सूरूच राहणार

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजना सूरूच राहणार

point

लाडकी बहीण योजनेला स्थगिती नाहीच

point

नोव्हेंबरपर्यंत खात्यात पैसे जमा होणार

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लावण्यात आला आहे. आणि नवीन अर्ज स्विकारणेही बंद करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना ही सूरूच राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला होता़. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने देखील लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महिलांच्या जीवात जीव आला आहे. (ladki bahin yojana scheme model code of conduct election commision of india maharashtra assembly election 2024 aditi tatkare)

हे वाचलं का?

लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लागणार असल्याच्या वृत्तानंतर इंडिया टुडेने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी बातचित केली होती.यामध्ये किरण कुलकर्णी यांनी ही लाडकी बहीण योजना कायम (सूरू राहील) राहणार आहे, अशी माहिती दिली. पण मॉडेल कोड ऑफ कडंक्टनुसार (MCC) कोणत्यागही नवीन लाभार्थी या योजनेत जोडला जाऊ शकत नाही. आणि जर महिला बालविकास विभागाला महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर करायचे असतील तर त्यांना निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! पुन्हा कधी मिळणार 1500 रुपये? 'ही' माहिती एकदा वाचा

मॉडेल कोड ऑफ कडंक्टच्या (MCC)सामान्य सूचनांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की,  MCC कालावधी दरम्यान कोणतीही नवीन योजना किंवा विद्यमान योजनांसाठी नवीन लाभार्थी जोडण्याची परवानगी नाही. निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय निधी वितरित केला जाऊ शकत नाही. राज्य सरकार एमसीसीच्या सूचनांचे पालन करत आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. तसेच सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. 

    follow whatsapp