Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेविरोधात बँक कर्मचाऱ्यांचं 'या' तारखेला आंदोलन! नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 04:47 PM • 21 Oct 2024

Bank Union Strike Against Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानं बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटत नसल्याचं यूनियनचं म्हणणं आहे.

Bank Union Strike Against Ladki Bahin Yojana

Bank Union Strike Against Ladki Bahin Yojana

follow google news

बातम्या हायलाइट

point

बँकेच्या या संघटनांनी लाडकी बहीण योजनेविरोधात पुकारला संप

point

बँक संघटनांच्या नेमक्या मागण्या काय?

point

लाडकी बहीण योजनेबाबत बँक संघटनांनी आंदोलनाचा निर्णय का घेतला?

Bank Union Strike Against Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 16 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानं बँक कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटत नसल्याचं यूनियनचं म्हणणं आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (UFBU) संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. यूएफबीयू बँक यूनियनची संघटना आहे. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभर्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे यूनियनने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 

हे वाचलं का?

बँक यूनियनने आंदोलनाचा निर्णय का घेतला?

यूएफबीयू (UFBU) चे स्टेट संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय की, लाडकी बहीण योजनेबाबत बँकांमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारकडून योजनेबाबत व्यवस्थित संवाद केला जात नाही. त्यामुळे बँकेतील कर्मचारी गोंधळलेले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि मारहाण केली जात आहे. यासाठी आम्ही एक दिवसीय आंदोलनाची हाक दिली आहे.

हे ही वाचा >>  Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, मातोश्रीवर वेगवान घडामोडी

योजनेला योग्य प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी सरकारने बँकांना पर्यायी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन दिली पाहिजे. काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून सेवा शुल्क कपात केल्याच्या मुद्द्यावर बोलताना तुळजापूर म्हणाले, बँकांच्या नियमांनुसार, सेवा शुल्क घेण्यात आलं होतं. परंतु, बँक खात्यात पैशांची कमतरता असल्याने त्यांना पैशांची वसुली करता आली नाही.

जेव्हापासून लाडकी बहीण योजनेची मासिक रक्कम बँक खात्यात जमा होत आहे, सिस्टमच्या आधीच्या निर्देशांनुसार सेवा शुल्क आपोआप कट होत आहे. त्यामुळे खातेधारक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. काही स्थानिक नेते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीही चूक नसताना ते बँक कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. 

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला स्थगिती नाहीच...डिसेंबरपर्यंत 1500 खात्यात येणार

'या' संघटनांचा पाठिंबा

यूफबीयूमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बैंक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI), इंडियन नेशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (INBEF), इंडियन नेशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC), नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) आणि नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स (NOBO) 

 

    follow whatsapp