Horoscope In Marathi :  नवरात्रीच्या उत्सवात 'या' राशींचं खुलणार नशीब! कुणाला मिळणार भरमसाट पैसा? वाचा एका क्लिकवर

मुंबई तक

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 07:00 AM)

3 October 2024 Astrology : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं.

Todays Astrology In Marathi

3 October 2024 Astrology

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशी होतील गडगंज श्रीमंत?

point

या राशींच्या व्यक्तींच्या संपत्तीत होईल वाढ

point

या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

3 October 2024 Astrology : ज्योतिष शास्त्रात राशींचं विशेष महत्त्व असतं. राशींच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं भविष्य किंवा वर्तमान स्थितीचं वर्णन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात मेषपासून मीन राशीपर्यंत एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ज्याचा राशींवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. 3 ऑक्टोबर 2024 ला बुधवार आहे. बुधवारचा दिवस श्रीगणेशाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं शुभ प्राप्ती होते. ज्योतिष गणनेनुसार 3 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचलं का?

मेष राशी 

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. आर्थिक लाभाचे योग येऊ शकतात. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल. लोकांनी चर्चा करताना सावध राहा. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.

वृषभ राशी 

आज एखाद्या गोष्टीमुळं कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मन अशांत राहील. वडिलांचं सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल. काही दिवसांपर्यंत जीवनात चढ-उतार होईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. आरोग्याबाबत सतर्क राहा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. नोकरीसाठी परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क राशी

या राशीच्या व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. नवीन काम सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मेहनत घ्या.

सिंह राशी

आज घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. एखाद्या जुन्या मित्राचं घरी आगमन होऊ शकतं. कौटुंबीक जीवन सुखी राहील. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. 

कन्या राशी 

आज तुम्हाला खूप महत्त्वाचा निर्णय रोखण्याची आवश्यकता आहे. नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. कार्यक्षेत्रातही बदल होऊ शकतात. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

तुळा राशी

आज तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. व्यापारांसाठी चांगला दिवस असणार आहे. कामकाजात प्रगती होईल. आर्थिक वाढ होईल.

वृश्चिक राशी

शिक्षणाच्या क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. नोकरीत अधिकाऱ्यांसोबत तालमेल ठेवा. कामकाजात तुमची प्रगती होऊ शकते. परदेशात जाण्याचा योग आहे.

धनु राशी

आज तुमच्या आत्मविश्वासात कमी राहणार नाही. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नोकरी करण्यांना दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक गोष्टी चांगल्या राहतील. 

मकर राशी

कार्यालयात तुम्हाला नवीन जबाबदारी दिली जाईल. नोकरी-कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कार्यालयात जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याबाबत काळजी घ्या.

कुंभ राशी

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक गोष्टींमध्ये वाढ होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल.खर्चात वाढ होईल. आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकते.

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आर्थिक गोष्टींमध्ये प्रगती होईल. कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत यश मिळू शकतं. व्यापारांसाठी चांगला दिवस आहे.

टीप - राशी भविष्याबाबत दिलेल्या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.

    follow whatsapp