30 September 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 30 सप्टेंबर 2024 ला सोमवार आहे. सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. भोलेनाथ शंकराची पूजा केल्यानं सर्व समस्यांतून मुक्ती मिळते आणि जीवनता सुख-समृद्धी नांदते.
ADVERTISEMENT
मेष राशी
कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. आर्थिक खर्चात वाढ होईल.
वृषभ राशी
शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.
मिथुन राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
कर्क राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
सिंह राशी
नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. क्रोधावर नियंत्रण ठेवा. खर्चामुळं नैराश्य येऊ शकतं. एखाद्या मित्राच्या सहयोगामुळं महत्त्वाचं काम होऊ शकतं.
कन्या राशी
आई-वडिलांचं सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकता.
तुळा राशी
आशा-निराशेचे भाव मनात येऊ शकतात. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. आत्मविश्वास कमी होईल. संवादात समतोल ठेवा.
वृश्चिक राशी
मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमी राहील. विनाकारण क्रोधी होऊ नका. कामकाजासाठी प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. आईच्या सहकार्यामुळे धनप्राप्ती होईल.
धनु राशी
आत्मविश्वास वाढेल. मन अस्वस्थ राहील. क्रोधापासून सावध राहा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील.
मकर राशी
आत्मविश्वास खूप वाढेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वभावात चिडचीडपणा राहील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
कुंभ राशी
मन अस्वस्थ राहील. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. खूप मेहनत करावी लागेल. आई-वडिलांचं सहकार्य लाभेल. नोकरीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मीन राशी
मानसिक आरोग्य चांगलं राहील. एखादं आर्थिक काम होईल. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांवर जाऊ शकता.
ADVERTISEMENT