Viral Photo: ओल्गा व्हॅलचिन्स्का या झेक महिलेने अलीकडेच LinkedIn वर एक फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये ती एका हातात बिअरची बाटली धरून समुद्रकिनाऱ्यावर बसली आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला दूध पाजताना दिसत आहे. (a woman was drinking beer while breast feeding a debate started when her picture appeared on the internet)
ADVERTISEMENT
ओल्गाने सांगितले की, हा फोटो 10 वर्षांपूर्वी थायलंडमध्ये काढला होता. तिने हे LinkedIn वर पोस्ट केले कारण ती पहिल्यांदा मुलांशिवाय सुट्टीवर जात आहे.
हे ही वाचा>> Extramarital Affairs: 'यासाठी' विवाहबाह्य संबंध ठेवतात स्त्री-पुरुष, कारण संसार...
ओल्गाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या 12 वर्षांत ती 18 महिने गरोदर होती आणि 71 महिने आपल्या मुलांना स्तनपान केलं. आता ती फेब्रुवारीमध्ये तिच्या पहिल्या सोलो व्हेकेशनवर जात आहे आणि याच काळात तिचे पुस्तक लिहिण्याचा विचार सुरू आहे.
Reddit वर वाद सुरू झाला
काही लोकांनी हे फोटो पाहून हा बेजबाबदारपणा असल्याचे म्हटले आहे. स्तनपान करताना अल्कोहोल पिणे मुलासाठी हानिकारक असू शकते. त्याच वेळी, काही लोकांनी तिचा बचाव केला आणि सांगितले की अल्कोहोलचा प्रभाव लगेच दुधापर्यंत पोहोचत नाही आणि ते पूर्णपणे सुरक्षित असू शकते.
हे ही वाचा>> Relationship Tips : नवरा-बायकोने 'या' 3 गोष्टींसाठी कधीच लाजू नये, नेहमी मिळेल सुख!
लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
एका Reddit यूजरने लिहिले की, ज्या लोकांना बाल संगोपनाबद्दल माहिती नाही त्यांना ते धोकादायक वाटू शकते. पण या महिलेने दारू पिण्याची योग्य वेळ निवडली आहे. तरीही, LinkedIn वर हे पोस्ट करणे विचित्र आहे. दुसऱ्या यूजरने सांगितले की, स्तनपान सामान्य करणे महत्त्वाचे आहे, परंतु LinkedIn वर असे फोटो पोस्ट करणे योग्य नाही. यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्राम अधिक चांगले झाले असते. एका यूजरने लिहिले की, हे फोटो मस्त दिसत आहे आणि हलकी बिअर पिणे हानिकारक नाही. पण प्रश्न असा आहे की.. ते पोस्ट करण्याची गरज का होती?
ADVERTISEMENT
