Santosh Bangar : शिंदेंचे आमदार संतोष बांगर समर्थकांचा भाजप जिल्हाध्यक्षाच्या घरावर हल्ला; तलवार, बंदूक...

मुंबई तक

24 Nov 2024 (अपडेटेड: 24 Nov 2024, 09:29 AM)

संतोष बांगर यांच्या काही समर्थकांनी भापज जिल्ह्याध्यक्षाच्या घरावर थेट हल्ला केल्याचं कळतंय. या घटनेत भाजप जिल्हाध्यक्षाचा भाऊ आणि बांगर यांचे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचं कळतं आहे. पोलिसांनी तब्बल 70 जणांवर गुन्हा दाखल केल्यांची माहिती समोर आली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष बांगर यांच्या समर्थकांचा भाजपवर हल्ला

point

हिंगोलीमध्ये घडलेल्या घटनेनंतर 70 जणांवर गुन्हा

 हिंगोली : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यावर थेट तलवारीन वार केल्याचं समोर आलं आहे. हल्ला करताना कार्यकर्त्यांकडे  पिस्तुल असल्याचंही समोर आलं आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बांगर यांच्या नातेवाईकासह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीवेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला.

हे वाचलं का?

पप्पू चव्हाण यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि गोळीबारही करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. या घटनेत पप्पू चव्हाणच्या भावावर तलवारीने सपासप वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

हे ही वाचा >> BJP MLA Winners List 2024: भाजपच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

दरम्यान, या घटनेत संतोष बांगर यांच्या पुतण्यासह काही जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही लोकांवर नांदेडच्या रुग्णालयात तर काहींवर हैदराबादमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या या घटनेनंतर पप्पू चव्हाणच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आमदार संतोष बांगर यांच्या नातेवाईकांसह 70 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व प्रकरण परस्पर वैमनस्यातून घडल्याचं सांगण्यात येतं आहे.


तक्रारीमध्ये काय म्हटलंय? 

आरोपींनी काही लोक जमवून घरावर हल्ला केला. घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकूण 60-70 मोटर सायकलींवर लोक आले होते. त्यांनी घराच्या काचाही फोडल्या. तसंच भाजप जिल्हाध्यक्षाच्या हातावर, मानेवर, डोक्यावर, पाठीवर गंभीर वार करुन त्यांना जखमी करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या हिंगोली शहरात निवडणूकपूर्व शांतता असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

    follow whatsapp