Google Free Meal: ...म्हणून गुगल कर्मचाऱ्यांना देतं मोफत जेवण, सुंदर पिचाई काय म्हणाले?

मुंबई तक

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 07:37 PM)

Google: गुगलचं वर्क कल्चर आणि खासगी जीवनातल्या अनेक गोष्टींवर पिचाई या कार्यक्रमात बोललेत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची फार चर्चा होतेय, ती म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणाचं कारण.

गुगल कर्मचाऱ्यांना का दिलं जातं मोफत जेवण? (फाइल फोटो)

गुगल कर्मचाऱ्यांना का दिलं जातं मोफत जेवण? (फाइल फोटो)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कसं आहे गुगलचं खास वर्क कल्चर?

point

खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलले सुंदर पिचाई

point

गुगलच्या कॅफेबद्दलची एक खास गोष्ट

Sundar Pichai on Google Free Meal: कॅलिफोर्निया: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच 'द डेविड रूबेनस्चटीन शो: पीयर टू पीयर कन्व्हर्सेशन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलाखत दिली. यादरम्यान, पिचाई यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. कंपनीचं वर्क कल्चर आणि खासगी जीवनातल्या अनेक गोष्टींवर पिचाई या कार्यक्रमात बोलले. मात्र, या सर्व गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची फार चर्चा होतेय, ती म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणाची! (google ceo sunder pichai says free meal is not just perk in the david rubenstein show)

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले सुंदर पिचाई?

गुगलच्या कॅफेमधील गप्पांमधून अनेक नवनवीन गोष्टी समोर आल्याचं पिचाई यांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, मोफत जेवणामुळे होणारे फायदे मोठे आहेत. कारण यामुळेच विचार करण्यासाठी आणि नवनवीन कल्पनांसाठी पोषक वातावरण तयार होतं.

हे ही वाचा>>Salman Khan Threat Message : 'सलमान'ला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?

गुगल कर्मचाऱ्यांच्या निवडीबद्दल  बोलताना पिचाई म्हणाले की, इंजिनीअरींग क्षेत्रातल्या सुपरस्टार सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचा आम्ही शोध घेत असतो. तसंच यावेळी आम्ही हे देखील पाहतो की, हे कर्मचारी शिकण्याची, नव्या गोष्टी आत्मसात करण्याची आणि पुढे जाण्याची इच्छाशक्ती असलेले हे कर्मचारी असावेत. 

पिचाई यांनी यावेळी हे देखील सांगितलं की, गुगल आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा देत असतं. ज्यामध्ये त्यांना बॉडी चेक-अप, डेन्टल चेक-अप, आय चेक-अपशी संबंधीत इन्शुरन्स देतं. तसंच फिटनेसशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम कर्मचाऱ्यांना फीट राहण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

हे ही वाचा>> Ravindra Dhangekar Tweet: रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?

आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं टाळणाऱ्या सुंदर पिचाई यांनी पहिल्यांदाच या कार्यक्रमात आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील हे 82 वर्षांचे आहेत. लहानपणापासून आपल्याला शिक्षणासाठी प्रवृत्त करणारे आईवडील आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत असंही ते म्हणाले. 

पत्नीबद्दल बोलताना ते म्हणाले की, आमची भेट IIT खडगपूरमध्ये झाली होती. त्यामुळे सुंदर पिचाई यांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमाची सध्या मोठी चर्चा होतेय.

    follow whatsapp