Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती होत आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 12 जागा, परिचारीका (महिला) या पदासाठी 11 जागा, परिचारीका (पुरूष) या पदासाठी 01 जागा, बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी 12 जागा अशा एकूण 36 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. (Govt Job 2024 recruitment in Thane municipal corporation Apply now last date till 7 september 2024 )
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1: MBBS/BAMS
- पद क्र.2: B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.3: B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.4: 1) 12वी (Science) उत्तीर्ण 2) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pune Crime : गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे केले अन्..., लाडक्या भावानेच का केली बहिणीची क्रूर हत्या?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र. 1- 18 ते 70 वर्ष
- पद क्र. 2 ते 4- 18 ते 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602 आहे.
हेही वाचा : Vanraj Andekar Murder Case : आंदेकर टोळीचा म्होरक्या कोण? वाचा INSIDE स्टोरी
अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScQaAzt7DNExC1VfjmS2l72L8fTIDvhkSvxkxjqf0fpBu91nQ/viewform?pli=1
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1y7kBQmzw9DS9MTkz7LNH-tbER5Po0l0I/view?usp=sharing
ADVERTISEMENT