Swaminarayan Mandir Abu Dhabi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते यूनायटेड अरब अमिराती (UAE) अबूधाबी (Abu Dhabi) येथे स्वामी नारायण मंदिराची स्थापना करण्यात आली. याकडे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील नवीन संबंधांची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. BAPS स्वामीनारायण मंदिराला UAE मधले पहिले हिंदू मंदिर देखील म्हटलं जात आहे. पण याशिवाय अशी पाच वैशिष्ट्ये आहेत जी या मंदिराला खास बनवतात. त्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
स्वामीनारायण मंदिरासाठी कोणी दिली जमीन?
मिळालेल्या माहितीनुसार, BAPS स्वामीनारायण मंदिर यूनायटेड अरब अमिराती (UAE) मधील अबू मुरेख जिल्ह्यात 27 एकर जागेवर बांधले जात आहे. ही जमीन यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी दिली आहे.
किती मोठंय मंदिर?
मंदिराची उंची सुमारे 33 मीटर, लांबी 80 मीटर आणि रुंदी 55 मीटर आहे. मंदिराला 7 शिखरे असून बाहेरील बाजूस 96 घंटा बसवण्यात आल्या आहेत. रामायण आणि शिवपुराणातील पौराणिक कथांसोबतच भगवान जगन्नाथाच्या यात्रेची झलकही मंदिराच्या भिंतींवर पाहायला मिळते. यासोबतच मंदिराजवळ गंगा घाटही बांधण्यात आला आहे.
मंदिर बांधण्यासाठी आलेला खर्च
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर बांधण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मंदिरासाठी भारतातील नद्यांमधून पाठवण्यात आलं आहे खास जल
मंदिरात पूजेसाठी गंगा-यमुनेचे जल खास पाठवण्यात आले आहे. माहितीनुसार, भारतीय नद्यांचे पाणी मोठ्या कंटेनरमध्ये वाहून नेण्यात आले आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, काशी येथे असलेल्या गंगा घाटप्रमाणे अबूधाबीतील मंदिरातही गंगा घाट बांधण्यात आला आहे. मंदिरात गंगा आणि यमुनेच्या रूपात दोन प्रवाह दिसतील. तसेच, त्रिवेणी संगमाचे प्रतिक असलेल्या सरस्वती नदीच्या रूपात लाइट बीम लावण्यात आले आहे.
मंदिरासाठी भारतातून पाठवण्यात आले आहेत गुलाबी वाळूचे दगड
मंदिर बांधण्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधील कुशल कारागिरांनी कोरलेले 25,000 दगडही पाठवण्यात आले आहेत. हे गुलाबी वाळूचे दगड खास उत्तर राजस्थानमधून अबूधाबीला पाठवण्यात आले आहेत. मंदिरात प्रार्थना हॉल, लायब्ररी, थीमॅटिक गार्डन आणि पाण्याचे कारंजे देखील पाहायला मिळतील.
ADVERTISEMENT