Ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारकडून सर्व महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजते. याचसोबत राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचाही शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं कळते आहे. सरकारच्या माध्यमातून मोफेत सिलेंडर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे. परंतु, यासाठी सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं अनिवार्य आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण फ्री गॅस सिलेंडर (ladki Bahin Free Gas Cylinder) मिळणार आहेत. राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वर्ष 2024-25 च्या बजेटनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरु केलं आहे. या माध्यमातून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
हे ही वाचा >> Ravindra Dhangekar Tweet: रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?
मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पात्रता
1) महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे.
2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडल्या गेलेल्या सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात की, त्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि या योजनेसाठी पात्र आहेत.
3) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला फ्री गॅस सिलिंडरचा लाभ मिळाला असेल, तर तुम्ही यासाठी योग्य ठराल.
3 गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी खात्यात जमा होतील पैसै
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हफ्ता सुरु करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही, त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याचं समजते. जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही केवायसी केलं नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.
ADVERTISEMENT