Kitchen Tips : आलं-लसूण फ्रेश ठेवायचंय? फक्त 'या' ट्रिक्स वापरा; अनेक दिवस होणार नाही खराब

Store Ginger Garlic: भारतीय किचनमध्ये लसूण आणि आलं मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. लंचपासून डिनरपर्यंत कोणत्या ना कोणत्या रेसिपीमध्ये आलं-लसणाचा वापर केला जातो. आलं आणि लसूण दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

kitchen tips, ginger garlic

kitchen tips, ginger garlic

मुंबई तक

• 07:03 PM • 31 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

आलं-लसूण दिर्घकाळ ताजं कसं ठेवणार?

point

या ट्रिक्सचा वापर करा अन् आलं-लसूण अनेक दिवस ठेवा फ्रेश

point

ताजं आलं स्टोर करण्याच्या टीप्स कोणत्या?

Store Ginger Garlic: भारतीय किचनमध्ये लसूण आणि आलं मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. लंचपासून डिनरपर्यंत कोणत्या ना कोणत्या रेसिपीमध्ये आलं-लसणाचा वापर केला जातो. आलं आणि लसूण दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या सेवनामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम तर होतोच, पण अन्नपदार्थही स्वादिष्ट होतात. पण जास्त गरमीमुळे आलं-लसूण खराब होतं आणि ते सुकतं. आलं-लसूण जास्त प्रमाणात स्टोर केल्यावर ते दिर्घकाळ ताजं कसं ठेवावं, यासाठी आम्ही तुम्हाला जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहोत.

हे वाचलं का?

ताजं आलं स्टोर करण्याच्या टीप्स

एका एयर टाईट बॅगमध्ये न सोललेलं आलं स्टोर करा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. एयरटाईट बॅगमुळे आद्रकवर मॉईश्चर आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे ते खराब होत नाही. गरमीत आद्रक खराब होण्याची शक्यता असते. एयरटाईट बॅगमध्ये आलं ठेवून ते फ्रीजमध्ये स्टोर केल्यावर आलं दोन महिन्यांपर्यंत ताजं राहू शकतं. 

हे ही वाचा >>  Bank Holidays in January 2025: 1 जानेवारी 2025 ला बँक आणि शेअर मार्केट राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एकदा वाचा

जर आद्रक कापलेलं आणि सोलून ठेवलेलं असेल आणि त्याचा वापर करायचा नसेल, तर आलं खराब न होण्यासाठी त्याला स्टोअर करा. यासाठी सालीच्या देठाला प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा. एक आठवड्यापर्यंत कापलेलं आणि सोलून ठेवलेलं आलं स्टोअर करू शकता. एखाद्या टाईट कव्हर जारमध्येही कापलेलं आलं ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. दोन महिन्यांपर्यंत हे ताजं आलं वापरू शकता.

ताजं लसूण स्टोअर करण्याचे टीप्स

लसणाला सहा महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. यासाठी लसूण खरेदी करताना काळजी घ्या. म्हणजेच त्याला अंकूर फुटलं आहे की नाही, हे तपासा. अशा लसणाला दिर्घकाळ ताजं ठेवण्यासाठी त्यांना लाईटपासून दूर ठेवा. म्हणजेच बॅग किंगा कंटेनरमध्ये पॅक करा. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या सोलून घेतल्या असतील किंवा कापल्या असतील, पण त्याचा उपयोग करायचा नसेल, तर त्या पाकळ्या फेकून न देता एअर टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. लसूण दोन ते तीन आठवड्यापर्यंत वापरणे योग्य ठरेल. लोक लसूण फ्रीजमध्ये ठेवत नाहीत. परंतु, लसूण योग्य पद्धतीने ताजं ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेऊ शकता. यासाठी लसणाला बारीक कापून ठेऊ शकता. 

हे ही वाचा >> New Rule 2025 : नवीन वर्षात बदलणार 'हे' 10 मोठे नियम! तुमच्या खिशाला लागणार कात्री?

    follow whatsapp