PAN Card: पॅन कार्ड बनवणं आहे खूप सोप्पं, पण 'एवढे' पैसे मात्र...

मुंबई तक

• 10:55 PM • 10 Jul 2024

Duplicate Pan Card: अनेकदा लोक जेव्हा त्यांचे पॅन कार्ड हरवतात किंवा चोरीला जातात तेव्हा त्यांना काळजी वाटते. अशा परिस्थितीत लोक घरबसल्या सहजपणे डुप्लिकेट पॅनसाठी अर्ज करू शकतात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाइन अर्ज करा अन् पॅन कार्ड मिळवा

point

डुप्लिकेट पॅन कार्ड नेमकं कसं मिळवाल?

point

पॅन कार्डसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Pan Card Fees: मुंबई: भारतात अशी अनेक कागदपत्रे आहेत जी सरकारकडून जारी केली जातात. ही कागदपत्रं प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. ती कागदपत्रं नसतील तर आपली अनेक कामे रखडतात. आधार आणि पॅनकार्ड ही अशीच कागदपत्रे आहेत, ज्याशिवाय तुमची अनेक कामे खोळंबतात. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय बँकिंग आणि आयकराशी संबंधित कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश लोकांकडे पॅनकार्ड आहे. मात्र, पॅनकार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यावर लोक चिंताग्रस्त होतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला तुमचे पॅन कार्ड पुन्हा कसे बनवायचे ते सांगणार आहोत. (how to make a pan card again know how much is fee for a duplicate pan how is online process)

हे वाचलं का?

नव्या पॅनकार्डसाठी असा करा अर्ज

पॅनकार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यावर नवं पॅनकार्ड कसं मिळवायचं हे अनेकांना माहीत नसतं. पण तुम्ही अगदी घरबसल्या देखील तुमचं नवं पॅनकार्ड मिळवू शकतात. ज्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड सहजपणे तुम्हाला मिळेल.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: पटकन अर्ज भरा... माझी लाडकी बहीण योजनेचे थोडेच दिवस शिल्लक!

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NSDL ची वेबसाइट onlineservices.nsdl.com वर जावे लागेल. यानंतर तुमच्याकडून येथे अनेक प्रकारची माहिती विचारली जाईल. ती सगळी माहिती योग्यरित्या भरा.

नव्या पॅनकार्डसाठी केवळ 50 रुपये फी!

वेबसाइटवर पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर माहिती टाकल्यानंतर तुम्हाला सब्मिट बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर पॅनकार्डची सर्व माहिती तुमच्यासमोर असेल. येथे तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्डचा पर्याय निवडावा लागेल आणि पत्ता भरावा लागेल.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल, ज्यावर OTP येईल. हे केल्यानंतर, तुम्हाला डुप्लिकेट पॅनसाठी शुल्क देखील भरावे लागेल. यासाठी केवळ 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे सर्व केल्यानंतर तुमचे पॅनकार्ड काही दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचेल.

पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा पॅन कार्डचा क्रमांक हा पूर्वीचाच असेल, हे नवीन पॅनकार्ड नसेल तर ती त्याच पॅन कार्डची डुप्लिकेट प्रत असेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या कालावधीत पॅन कार्डमध्ये दुरुस्ती देखील करू शकता.

    follow whatsapp