Ladki Bahin Yojana:  महिलांनो! अजूनही 7500 मिळाले नाहीत? 'या' यादीत तुमचं नाव तपासा

मुंबई तक

29 Oct 2024 (अपडेटेड: 29 Oct 2024, 06:18 PM)

 Ladki Bahin Yojana Gramin List Check : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी अर्ज भरले आहेत.

Ladki Bahin Yojana Gramin List

Ladki Bahin Yojana Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट वाचली का?

point

कुणा कुणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत? 'ही' यादी तपासा

point

;'त्या' महिलांनाच मिळाले लाडकी बहीण योजनेचे 7500

 Ladki Bahin Yojana Gramin List Check : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी अर्ज भरले आहेत.सरकारने घोषित केलेल्या माहितीनुसार, राज्यातील 2.5 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर 2 कोटी 34 लाखांहून अधिक महिलांना पाच हफ्त्यांचे 7500 रुपये मिळाले आहेत. परंतु, अजूनही राज्यातील लाखो महिला या योजनेपासून वंचित आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्या पात्र महिलांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात येत आहे. ज्या महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत, त्यामगे अनेक कारणं असू शकतात.

हे वाचलं का?

सरकारने जारी केलेल्या लाभार्थ्यांच्या सूचीत ज्या महिलांचं नाव आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिला ग्रामीण भागाशी संबंधीत आहेत, त्यांनी लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लिस्ट चेक केली पाहिजे. ग्रामीण लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही, हे नक्की तपासा. 
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेची घोषणा केल्यानंतर 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024: महायुतीचा पाच जागांवर तिढा कायम? कोणत्या मतदारसंघांचा समावेश?

15 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या तारखेपर्यंत राज्यातील 2.5 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज भरला आहे. लाडकी बहीण योजनेत ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातील महिलांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्जाबाबत माहिती गोळा केली जात आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहीवासी असाल, तर तुम्हाला ग्रामीण लिस्ट नक्कीच तपासावी लागेल.

हे ही वाचा >> Fresh death threat against Salman Khan: सलमान खानसह मुंबईच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची पुन्हा धमकी, यामागे कुणाचा हात?

इथे पाहा लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लिस्ट 

ज्या महिलांना ग्रामीण लिस्ट तपासायची आहे, त्या महिला ही लिस्ट ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तपासू शकतात. महिलांना ही लिस्ट ऑनलाईन तपासण्यासाठी अधिकृत Nari Shakti Doot App वर जावं लागेल. या अॅपवर तुम्ही लिस्ट तपासू शकता. महिलांना जर ऑफलाईन पद्धतीने ही लिस्ट तपासायची असेल, तर त्या महिलांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. त्यानंतर तुम्हाला पात्र महिलांची यादीबाबत माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही अंगणवाडी अधिकाऱ्यांना संपर्क करून ग्रामीण लिस्ट तपासू शकता.

    follow whatsapp