शरीरावर टॅटू म्हणजे सरकारी नोकरी विसरा... पण खरा नियम काय?

मुंबई तक

• 06:18 PM • 27 Aug 2024

Tattoo on your body : जगभरात टॅटूची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये, लोकांना अंगावर टॅटू बनवयला आवडतो. गेल्या काही वर्षांत भारतातही परमनन्ट डिझायनर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे.

Mumbaitak
follow google news

Tattoo on your body : जगभरात टॅटूची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये, लोकांना अंगावर टॅटू बनवयला आवडतो. गेल्या काही वर्षांत भारतातही परमनन्ट डिझायनर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? की, परमनन्ट टॅटूमुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. यासाठी असलेल्या नियमांविषयी या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात. (if you have a tattoo on your body you will not get a government job know what do the rules)

हे वाचलं का?

जगभरात टॅटूची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. खासकरून तरुणाईत... आताची मुलं कूल आणि स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू काढत आहेत. राष्ट्रीय टॅटू दिवस दरवर्षी 17 जुलै रोजी साजरा केला जातो. अशावेळी टॅटू काढणं किती धोकादायक ठरू शकतं याविषयी समजून घेऊया. बऱ्याच अहवालांमधून असे समोर आले आहे की टॅटू काढणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. पण याव्यतिरिक्त भारतातील अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या लोकांच्या अंगावर टॅटू आहे त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. 

हेही वाचा : Badlapur News: 'तुझा रेप झालाय का?', असा आरोप असलेल्या वामन म्हात्रेंचं 'ते' CCTV फुटेज समोर

शरीरावर टॅटू म्हणजे आता सरकारी नोकरी विसरा!

भारतात अशा अनेक सरकारी नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये शरीरावर टॅटू काढण्याची परवानगी नाही. अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये अंगावर टॅटू असल्याने इच्छुक उमेदवार अपात्र ठरतात. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय वायुसेना, भारतीय तटरक्षक दल, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि पोलीस विभागात याबाबत कठोर प्रतिबंध आणि नियम आहेत.

टॅटूच्याबाबतीत आदिवासी समाजातील उमेदवारांसाठी नियम काय?

जर उमेदवार आदिवासी समाजातून आला असेल, तर काही सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटूबद्दल काहीही बोललं जात नाही. पण यासाठीही एक अट आहे की टॅटू लहान असावा आणि समाजाशी संबंधित असावा. कोणाच्याही भावना दुखावणारे कोणत्याही प्रकारचे फॅशनेबल टॅटू स्वीकारले जात नाहीत, अशा परिस्थितीत नोकरीची संधी मिळत नाही.

टॅटू संबंधित असलेले नियम

अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटूबाबत वेगळे कठोर नियम आहेत. निवड करताना उमेदवार यामध्ये अडकला तर त्याला हवाई दल, भारतीय नौदल, तटरक्षक दल, संरक्षण यासारख्या ठिकाणी नोकरी मिळण्यात अडचणी येतात.

हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj: शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यासाठी शिंदे सरकारने किती कोटी दिलेले?

टॅटूवर बंदी का?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की टॅटूवर बंदी का आहे? शरीरावर टॅटू असल्याने सरकारी नोकरी न मिळण्याची तीन मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे टॅटूमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये एचआयव्ही, त्वचा रोग आणि हिपॅटायटीस ए आणि बी सारख्या गंभीर आजारांचा धोका असतो. दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे टॅटू काढणारी व्यक्ती शिस्तबद्ध नसते. तो कामापेक्षा छंदांना अधिक महत्त्व देतो. तिसरे आणि सर्वात मोठे कारण सुरक्षेशी संबंधित आहे. टॅटू असलेल्या उमेदवारांना सुरक्षा दलात अजिबात नोकरी दिली जात नाही. कारण यामुळे सुरक्षेचा धोका वाढतो.

    follow whatsapp