Video: काय सांगता! टोपलीभर लसूण झटपट होतील सोलून; फक्त 'या' ट्रिक्सचा वापर करा

मुंबई तक

07 Oct 2024 (अपडेटेड: 07 Oct 2024, 06:11 PM)

Garlic Peeling Hack Viral Video: किचनमध्ये लसूण योग्य पद्धतीने सोलनं अनेकांसाठी किचकट काम असतं. पण किचनमध्ये जेवण शिजवणं अनेक लोकांना आवडतं.

Garli Peels Trick Video

How To Peel Garlic Properly

follow google news

बातम्या हायलाइट

point

लसूण सोलण्याची भन्नाट ट्रिक माहितीय का?

point

किलोभर लसूण काही मिनिटांतच होतील सोलून, फक्त...

point

लसूण सोलण्याच्या ट्रिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Garlic Peeling Hack Viral Video: किचनमध्ये लसूण योग्य पद्धतीने सोलनं अनेकांसाठी किचकट काम असतं. पण किचनमध्ये जेवण शिजवणं अनेक लोकांना आवडतं. पण लसूण सोलायचं काम असल्यास काही लोकांच्या कपाळाला आठ्या येतात. पण टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. कारण लसूण सोलण्याची एक जबरदस्त ट्रिक व्हायरल झाली आहे.

हे वाचलं का?

लसूण सोलण्यासाठी खूप वेळ लागतो. यावर अनेक मिम्सही बनवण्यात आले आहेत. घरात फावळ्या वेळेत काही महिला किचनमध्ये लसूण सोलण्याचं काम करतात. परंतु, इन्स्टाग्रामवर लसूण सोलण्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, आधी का नाही पाहिला हा व्हडिओ. (Peeling garlic properly in the kitchen is a complicated task for many. But many people like to cook food in the kitchen)

हे ही वाचा >>  Optical illusion Test: फोटोत दिसणारा प्राणी कोणता? बैल की हत्ती? एका क्लिकवर खरं उत्तर मिळेल

जेवण शिजवणाऱ्या पुरुष किंवा महिलांसाठी हा व्हिडीओ खूप फायदेशीर ठरू शकतो. या व्हिडीओत दाखवलेल्या ट्रिक्समुळे तुम्ही लसणाची पाकळी सहज सोलू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एका छोट्या चिमट्याची आवश्यकता असेल. तसच याचा वापर वेगवेगळ्या कामासाठी करू शकता. हा चिमटा तुमच्या किचनमध्ये नसेल, तर तुम्हाला बाजारातही हा चिमटा मिळू शकतो.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची वेळ आणि मेहनत वाचेल. ज्या लोकांना लसणू सोलण्याचा खूप कंटाळा येतो, त्यांच्यासाठी ही भन्नाट ट्रिक खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्यांना कमी वेळेत लसूण सोलायचे आहेत, त्यांनी हा व्हिडीओ नीट पाहावा आणि यात सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर करावा. या व्हिडीओत पाहू शकता की, नखं नसतानाही लसूण सोलण्याचं काम काही मिनिटातच पूर्ण होतं. 

हे ही वाचा >> किचनच्या भिंतींवर तेलाचे डाग लागलेत? काही मिनिटातच चिकटपणा होईल साफ, वाचा 'या' सोप्या Kitchen Tips

इथे पाहा व्हिडीओ

नखाने लसूण सोलण्याची गरज नाही

व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला क्लिपरच्या मदतीने झटपट लसूण सोलण्याचं काम करत आहे. तुम्हीही नखाचा वापर न करता काहीही मिनिटांतच लसूण सोलू शकता. कारण या व्हिडीओ लसूण सोलण्याची जबरदस्त ट्रिक्स सांगितली आहे. या व्हिडीओला 7 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

    follow whatsapp