किचनच्या भिंतींवर तेलाचे डाग लागलेत? काही मिनिटातच चिकटपणा होईल साफ, वाचा 'या' सोप्या Kitchen Tips

How To Clean Oil From Kitchen Walls : थोड्या दिवसातच दिवाळीच्या सणाची धामधूम सुरु होणार आहे. त्यामुळे लोकांनी आतापासून घरातील साफसफाईच्या कामाला सुरुवात केलीय.

How To Clean Oil From Kitchen Walls

How To Clean Oil From Kitchen Walls

मुंबई तक

• 05:17 PM • 06 Oct 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

'हे' आहेत किचनच्या डागळलेल्या भिंती साफ करण्याचे सोपे उपाय

point

'या' गोष्टींचा वापर करा अन् भिंती करा झटपट साफ

point

किचनच्या भिंती साफ करण्यासाठी काय कराल?

How To Clean Oil From Kitchen Walls : थोड्या दिवसातच दिवाळीच्या सणाची धामधूम सुरु होणार आहे. त्यामुळे लोकांनी आतापासून घरातील साफसफाईच्या कामाला सुरुवात केलीय. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात साफसफाई करणं खूप शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, स्वच्छ घरांमध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्यामुळे सण सुरु होण्याआधीच लोक घरातील कानाकोपऱ्यात सफाई करतात. पण अनेक लोक या साफसफाईची सुरुवात घरातील किचनमधून करतात. (The festival of Diwali will begin in a few days. So people have started cleaning the house from now)

हे वाचलं का?

तुम्ही जर घरातील किचनच्या शेल्फ, सिंक, गॅस या गोष्टींना चकाचक साफ केलं असेल, पण किचनच्या भिंतींना लागलेले तेलाचे डाग साफ होत नसतील, तर आम्ही तुम्हा काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. जेवण शिजवताना किचनच्या भिंतीवर तेलाचे डाग लागतात आणि कालांतराने हे डाग जास्त चिकट होतात. यासाठी आम्ही तुम्हाला खास टीप्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही भिंतीला लागलेडे डाग सहज साफ करू शकता. 

किचनच्या भिंतीला चकाकी आणण्यासाठी काय कराल?

प्रत्येक किचनमध्ये सफेद व्हिनेगारचा वापर होतो. या व्हिनेगारचा किचनच्या अनेक कामांमध्ये फायदा होतो. भिंतींना लागलेले तेलाचे डाग हटवण्यासाठीही तुम्ही या व्हिनेगारचा वापर करू शकता. त्यामुळे एका साफ कपड्याला तुम्ही पाण्याने भिजवू शकता. आता एका वाटीत व्हिनेगार टाका. त्यामध्ये हा भिजवलेला कपडा पिळून टाका. हा कपडा भिंतीवरून जोरात फिरवा. असं केल्याने भिंतीवरील सर्व डाग काही मिनिटातच साफ होतील. असं केल्याने भिंतीवरील डाग सहजपणे साफ होतील. व्हिनेगारमध्ये भिजवलेला कपडा भिंतीवरून फिरवा आणि दुसऱ्या कपड्याने पुन्हा त्या भिंतीला साफ करा, त्यामुळे भिंतींना चकाकी येईल.

हे ही वाचा >> Wash Basin आणि बाथरुमच्या पाईपजवळ केस अडकलेत? एका मिनिटात ब्लॉकेज साफ होईल, फक्त 'हे' लगेच करा

एका वाटीत गरम पाणी घ्या. या पाणीत शॅम्पू मिक्स करा आणि लिंबूचा रस त्या पाण्यात मिसळून घ्या. आता पाण्याचं हे मिश्रण एका स्वच्छ स्पंजमध्ये भिजवा. त्यानंत तो स्पंज डाग लागलेल्या भिंतीवरून फिरवा. असं केल्यानंही भिंतीवरील डाग साफ होतील.

डिशवॉशिंग जेल आणि सोडा

याव्यतिरिक्त तुम्ही डिशवॉशिंग जेल आणि बेकिंग सोडाची मदत घेऊ शकता. सर्वात आधी तुम्ही तुमच्या हातात ग्ल्वोज घाला. आता एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या. या पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि डिशवॉशिंग जेल मिक्स करा. हे मिश्रण स्पंजमध्ये भिजवा आणि त्यानंतर या स्पंजला डागाळलेल्या भिंतीवरून फिरवा. 

    follow whatsapp