Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची 'ती' चूक...

मुंबई तक

04 Oct 2024 (अपडेटेड: 04 Oct 2024, 05:52 PM)

Ladki Bahin Yojana Installement : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले आहेत.

ladki bahin yojana bank deduct third installment amount on women bank aditi tatkare warn bank staff mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde

त्या महिलांच्या खात्यात 4500 पुन्हा खात्यात जमा होणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेने कापले

point

बँकेत पैसे येऊन देखील लाभ मिळाला नाही

point

महिलांनी आता काय करावे?

Ladki Bahin Yojana Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे.तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. असे असताना आता काही महिलांच्या खात्यात जमा झालेले हे पैसे बँकेकडून(Deduction) कापण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा मिळणार आहे. नेमके हे पैसे कसे मिळणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana bank deduct third installment amount on women bank aditi tatkare warn bank staff mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde) 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले आहेत. हे पैसे जमा झाल्यानंतर महिलांनी सूटकेचा श्वास घेतला होता. मात्र पैसे आल्या आल्या आता खात्यातून कापण्यात आले आहे. 

हे ही वाचा : Gold-Silver Price: सोन्याचा तर विषयच हार्ड! किंमतीही धमाकेदार... आजचे भाव किती रूपयांनी वाढले?

ज्या महिलांनी त्यांच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स मेनटेने ठेवले नव्हते. किंवा दंडात्मक स्वरूपात त्या महिलांच्या खात्यातून योजनेचे पैसे वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना मोठा झटका बसला होता. या संदर्भात अनेक महिलांनी आदिती तटकरे यांच्याजवळ बँका पैसे कापत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. अनेक तक्रारींचा खच तर त्याच्या एक्स अकाऊंटवर पडला होता. 

या तक्रारीची दखल आता महिला आणि बाल विकास विभागाने दखल घेतली आहे. याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana : दर महिन्याला 10 हजार मिळणार! लाडक्या भावांनो, कसा कराल अर्ज, योजनेच्या अटी काय?

लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावं, असेही निर्देशही बँकांना दिले आहेत.त्यामुळे आता ज्या महिलांच्या योजनेचे पैसे बँकेने कापले आहेत ते पैसे पुन्हा एकदा बँका खात्यात जमा करणार आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

    follow whatsapp