Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, महिलांना मिळाला दिलासा

मुंबई तक

29 Sep 2024 (अपडेटेड: 29 Sep 2024, 02:44 PM)

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे

ladki bahin yojana scheme aditi tatakare declare number women get benefit of third installment eknath shinde ajit pawar devendra fadnavis

तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सूरूवात

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सूरूवात

point

किती महिलांच्या खात्यात पैसे आले

point

अधिकृत आकडा आला समोेर

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सूरूवात झाली आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. काहींच्या खात्यात 4500 तर काहींच्या खात्यात 3500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात तिसरा टप्पा जमा झाला आहे. याचा अधिकृत आकडा समोर आला आहे. तसेच तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालं आहे? हे देखील जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme aditi tatakare declare number women get benefit of third installment eknath shinde ajit pawar devendra fadnavis) 

हे वाचलं का?

राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार  25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

हे ही वाचा :  Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचे अर्ज मंजूर, पण बँकेत किती पैसे येणार?

तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांच्या तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत. त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत, त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया  युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 4500 खात्यात आलेच नाही...आता पुढे काय करायचं?

ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत. पण तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्याच्या खात्यात जमाच झाले नाहीयेत. अशा महिलांच्या खात्यात 31 सप्टेंबरपर्यंत पैसा जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

    follow whatsapp