Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा व्हायला सूरूवात झाली आहे. काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये तर काही महिलांच्या खात्यात हे 7500 जमा झाले आहेत. पण यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? आणि किती तारखेला पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme fourth and fifth installment amount deposite 3000 or 7500 rupees deposite mukhymantri ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला होता. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 4500 तर काही महिलांच्या 1500 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना नेमके किती पैसे मिळणार आहेत. हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?
3 हजार रूपये कुणाला मिळणार?
ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.
7500 कुणाच्या खात्यात येणार?
ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत.पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यांच्या खात्यात आता जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?
दरम्यान चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले देखील आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आले नाहीयेत त्या महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबरआधी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात आपलं बँक पासबूक आणि बँक खातं चेक करावं.
ADVERTISEMENT