Ladki Bahin Yojana : खात्यात 3000 जमाच झाले नाही, महिलांनो कुठे कराल तक्रार?

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 03:20 PM)

Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेत अनेक महिलांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 1 ते 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रूपये खात्यात जमा झाले आहेत.

ladki bahin yojana scheme if you never get 3000 rs installment where should complaint and enquiry  mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सुरुवात

point

राज्यातील महिलांच्या खात्यात ओवाळणी पोहोचली

point

त्या महिलांनी कुठे तक्रार करायची?

Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan) लाडक्या बहिणींना दिलेली ही ओवाळणी आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात ही ओवाळणी पोहोचली आहे. मात्र अद्याप अनेक महिला या ओवाळणी पासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले नाहीयेत. त्यांनी नेमकं करायचं काय? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme if you never get 3000 rs installment where should complaint and enquiry mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेत अनेक महिलांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 1 ते 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3000 रूपये खात्यात जमा झाले आहेत. याच दरम्यान अनेक महिलांनी जुलैआधीच अर्ज दाखल  केले होते. मात्र तरीही त्याच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत? अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्या कारणाने, या महिलांना नेमका कसा पाठपूरावा करावा? हे पाहूयात.

हे ही वाचा : Sanjay Raut: 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा?

विशेष म्हणजे आतापर्यंत या योजनेत ज्या महिलांनी जुलै आधी अर्ज दाखल केले आहेत,त्याच्यात खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टपासून अर्ज करायला सुरूवात  केली आहे. त्यांच्या अर्जाची छाननी सध्या सुरु झाली आहे. त्यामुळे जे अर्ज पात्र ठरतील. त्या लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. 

महिलांना तक्रार करता येणार? 

माझी लाडकी बहीण योजनेत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही181 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत अॅपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच  त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे. 

हे ही वाचा : Gold Price Today: थोडं का होईना, रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! आजचा भाव काय?

'इतक्या' महिलांना मिळाला योजनेचा लाभ 

राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या योजनेत किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, याचा आकडा सांगितला आहे. 16 ऑगस्टला सकाळी 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच याआधी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाला आहे. अशाप्रकारे एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तर उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचा विश्वास देखील आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

    follow whatsapp