Ladki Bahin Yojana : तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात, पण 'या' महिलांना एकही रूपया मिळणार नाही

मुंबई तक

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 02:34 PM)

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

ladki bahin yojana third installement date declare aditi tatakare mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar

तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली

point

या तारखेला पैसे खात्यात होणार जमा

point

पण या महिलाच्या खात्याच काय?

Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रूपया जमा होणार नाही आहे. त्यामुळे या महिला कोण असणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana third installement date declare aditi tatakare mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar) 

हे वाचलं का?

 लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : Gold Rate Today: सोन्याचा भडकाच! ग्राहकांच्या खिशाला चटका... वाचा आजचे भाव एका क्लिकवर

लाडकी बहीण योजजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी पहिला हप्त्यात आपण 1 कोटी 7 लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत करण्यात आला होता. त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. आता येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 ऑगस्टला जमा होणार आहे.

कुणाला 4500 रूपये मिळणार?

आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे? याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

'या' महिलांच्या खात्यात 1500 येणार 

दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्याच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हे ही वाचा : Akshay Shinde Encounter :एन्काऊंटर की हत्या? आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? खासदार नरेश म्हस्के म्हणाले..

तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे. त्या महिलांना देखील याच महिन्यात 1500 रूपये मिळणार आहेत. पण त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्वाचे आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननीची प्रक्रिया ही 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला तर तुमच्या खात्यात 1500 जमा होतील आणि अर्ज मंजुरच झाला नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रूपया येणार नाही. त्यांना कदाचित पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 

    follow whatsapp