Ladki bahin Yojana : 19 ऑगस्टला मिळणार पैसे, तुमचा अर्ज कुठंपर्यंत पोहोचला; कसे बघणार?

मुंबई तक

03 Aug 2024 (अपडेटेड: 03 Aug 2024, 04:35 PM)

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : जुलै आणि ऑगस्टचे असे एकत्रित मिळून सरकार 3000 रूपये खात्यात जमा करणार आहे. येत्या 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसै खात्यात येणार आहे. पण तत्पुर्वी तुम्ही केलेला अर्ज हा पात्र ठरणे खुप आवश्यक आहे.

ladki bahin yojana what was the status of your application it is approved rejected or pending  mukhymantri majhi ladki bahin yojana scheme

तुम्ही केलेला अर्ज हा पात्र ठरणे खुप आवश्यक आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे खात्यात येणार

point

तत्पुर्वी अर्ज हा पात्र ठरणे खूप आवश्यक

point

तुम्ही पात्र ठरलात की नाही हे कसे तपासायचे?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Application Status : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहेत. पण जुलै आणि ऑगस्टचे असे एकत्रित मिळून सरकार 3000 रूपये खात्यात जमा करणार आहे. येत्या 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसै खात्यात येणार आहे. पण तत्पुर्वी तुम्ही केलेला अर्ज हा पात्र ठरणे खुप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पात्र ठरलात की नाही हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana what was the status of your application it is approved rejected or pending  mukhymantri majhi ladki bahin yojana scheme) 

हे वाचलं का?

राज्य सरकार येत्या 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसै जमा करणार आहे. या तारखेला आता अवघे 16 दिवस उरले आहेत. या 16 दिवसात तुम्ही केलेला हा अर्ज योजनेसाठी पात्र ठरणे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खात्यात पैसै जमा होणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही केलेला अर्ज सरकारी पातळीवर नेमका कुठे पोहोचलाय? अर्ज पात्र ठरलाय की अपात्र आहे किंवा रिजेंक्ट करण्यात आला आहे? हे नेमकं कसं तपासायचं आहे? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : ''मी ढेकणांना...'', ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल. 

स्टेटसमधल्या 'या' पर्यायाचा अर्थ काय? 

Approved 

जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

Pending for Approval  

आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल. 

हे ही वाचा : Yashashree Shinde news : यशश्रीची ज्या कोयत्याने केली हत्या, तो कुठे सापडला? Inside Story

Edit and Resubmit

आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रूटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रूटी दिली आहे ती त्रूटी काढून आपला अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे. 

Reject

 जर आपल्या अर्जात वरील प्रमाणे म्हणजे REJECT हा  पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला. या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे.

    follow whatsapp