Mazi Ladki Bahin Yojana DBT Active: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कम महिलांना मिळाली आहे, अशीही माहिती सरकारच्या वतीनं सांगण्यात येते. दरम्यान, महिलांना पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागली आहे.
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियम पाळावे लागतात. वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: आर्थिक संकटामुळे 'या' राशीच्या लोकांवर येणार साडेसाती! काही राशींना मिळणार आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपये हे एकत्र मिळणार आहेत. ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून. म्हणजेच एकाच महिन्यात महिलांना एकूण 3000 रुपये मिळणार आहे. खरं तर हे एक प्रकारे दिवाळी गिफ्टच आहे. कारण महिलांना थेट 3000 रुपये हे वापरण्यासाठी मिळणार आहेत. पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
त्या महिलांनाच मिळणार 3000 रुपये
ज्या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत आणि ज्यांच्या बँक खात्यातील DBT इनेबल आहे किंवा अॅक्टिव्ह आहे अशा महिलांनाच हे 3000 रुपये मिळणार आहेत.
कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील?
महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
ADVERTISEMENT