Ladki Bahin Scheme Status Check : केंद्रातलं आणि राज्यातलं महायुती सरकार जनतेसाठी अनेक योजना राबवतंय. या सरकारी योजनांचा लाभ देशातील करोडो लोक घेतायत. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सरकार मोठे प्रयत्न करताना दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने काही महिन्यांपूर्वी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना सरकार 1500 रुपये देतं. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते पाठवण्यात आले आहेत, मात्र तुमच्या खात्यात ऐन दिवाळीच्या महिन्यात पैसे आले नाहीत का? जाणून घ्या तुमचं स्टेटस चेक करण्याची सोपी प्रक्रिया.
ADVERTISEMENT
कसं चेक कराल स्टेटस?
How to Check Status Payment of Ladki Bahin Scheme: राज्य सरकारकडून पाठवले जाणारे माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे काही अडचणींमुळे अनेकांना मिळाले नाहीत. त्यामुळे तुमचे पैसे कुठे अडकलेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या हप्त्याचं स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला होमपेजवर लॉग इन करण्याचा पर्याय असेल आणि खाली तुम्हाला लाभार्थीची स्थिती पाहण्याचा पर्याय असेल.
लाभार्थींचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तिथे दिलेल्या पर्यायावर क्लिक करावं लागेल. ज्यावर तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा पर्याय असेल. नोंदणी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल, त्यानंतर गेट मोबाइल ओटीपी वर क्लिक करावं लागेल. यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल.
अर्जप्रक्रिया कशी आहे?
ज्या महिलांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केले नसतील, त्यांच्यासाठी अर्जप्रक्रियेबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे.
How to Get Installment for Ladki Bahin Yojana:१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
ADVERTISEMENT