ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! नव्या वर्षात 'या' तारखेला मिळणार 2100? मोठी अपडेट आली समोर

Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे  2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे.

महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई तक

• 05:41 PM • 01 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार?

point

महायुती सरकार 'ते' आश्वासन पूर्ण करणार का?

point

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट एकदा वाचाच

Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे  2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत.लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे. याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या 12 लाखांहून अधिक महिलांनाही फायदा झाला आहे.

हे वाचलं का?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी दरम्यान वचन दिलं होतं की, जर महायुती पुन्हा सत्तेत आली, तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये दिले जातील. त्यामुळे महिलांना या रक्कमेची प्रतिक्षा लागल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलंय.
रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांमध्ये वाढ करून 2100 रुपये केलं जाऊ शकतं. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं.

हे ही वाचा >> Jalgaon Paladhi Curfew : गुलाबराव पाटील यांच्या गावात असं काय घडलं की थेट संचारबंदी लागू करावी लागली?

परंतु, राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीनं पैसे वाढवणं कठीण होईल, असं बोललं जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची शक्यता धुसर आहे. मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये दिले जातील. अशातच 2100 रुपयांचा हफ्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरिब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis: "दहा हजार लोकांना रोजगार..." ; वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचं मोठं विधान!

    follow whatsapp