Navratri 2024: यंदा नवरात्रीत 'हे' आहेत 9 रंग, पहिल्या दिवशी तर...

मुंबई तक

28 Sep 2024 (अपडेटेड: 28 Sep 2024, 06:24 PM)

Navratri 9 Colors Astrology : अनेक लोक आपल्या घरातील दरवाज्यावर, मंदिरात किंवा कारमध्ये 9 रंगाचे कागद किंवा कपड्यांची पताका टांगतात. हे फक्त सौंदर्य, आकर्षण वाढवण्यासाठी किंवा फॅशनसाठी नसतं.

Navratri 9 Colors Horoscope

Navratri 2024 Colors Astrology

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरात्री उत्सवात नऊ दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे?

point

नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व जाणून घ्या एका क्लिक वर

point

...तरच नवरात्रीत माता लक्ष्मी प्रसन्न होईल?

Navratri 9 Colors Astrology : अनेक लोक आपल्या घरातील दरवाज्यावर, मंदिरात किंवा कारमध्ये 9 रंगाचे कागद किंवा कपड्यांची पताका टांगतात. हे फक्त सौंदर्य, आकर्षण वाढवण्यासाठी किंवा फॅशनसाठी नसतं. हिंदू धर्मात याला धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. नऊ दिवस सुरु राहणाऱ्या नवरात्री उत्सवात दुर्गा मातेची विविध रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या दिवशीही 9 दिवसात 9 रंगाचे कपडे धारण करून देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि याच काय महत्त्व आहे?

हे वाचलं का?

नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 रंग

नवरात्रीच्या दिवशी रंगांचं विशेष महत्त्व असतं. कारण हे भक्तांना देवीच्या वेगवेगळ्या रुपांना जोडतात. प्रत्येक रंग देवीच्या विशेष गुणांना दर्शवतो. प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आणि महत्त्व असतं. या रंगांना धारण केल्यानं देवीची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक उर्जा येते.

पहिला दिवस : 4 ऑक्टोबर, 2024

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचं पहिलं रुप शैलपुत्रीची पूजा केली जाते. 3 ऑक्टोबरला गुरुवारचा दिवस असल्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यानं लाभ होईल. पिवळा रंग आशा आणि प्रसन्नतेचा प्रतिक आहे.

दुसरा दिवस : 4 ऑक्टोबर, 2024

4 ऑक्टोबरला देवी मातेचं दुसरं दिव्य रुप माता ब्रम्हचारिणीची पूजा हिरव्या रंगाचे कपडे घालून करा. हिरवा रंग प्रकृतीचा प्रतिक आहे. विकास, उर्वरता, शांती आणि स्थिरतेच्या भावनेला निर्माण करतो. शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्यानं जीवनात एक नवी सुरुवात येते. 

तिसरा दिवस : 5 ऑक्टोबर, 2024

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 5 ऑक्टोबरला माता देवीचं तिसरं रुप चंद्रघंटा मातेची पूजा स्टेली रंगाचे कपडे घालून करा. हे केल्यानं व्यक्ती व्यवहारीक होतो. त्याचा स्वभावही शांत होतो.

हे ही वाचा >> Optical Illusion : फोटोत खार दिसतेय? ती खार नाही, फक्त एकदा क्लिक करून पाहा

चौथा दिवस : 6 ऑक्टोबर, 2024

रविवार 6 ऑक्टोबरला दुर्गा मातेचं चौथं दिव्य रूप कुष्माण्डा मातेची पूजा नारंगी रंगाचे कपडे धारण करून केलं पाहिजे. यामुळे जीवनात स्फूर्ती आणि सकारात्मक उर्जा मिळते. तसच आत्मविश्विस आणि मनोबल वाढतं.

पाचवा दिवस : 7 ऑक्टोबर, 2024

सोमवारी 7 ऑक्टोबरला माता देवीची कृपा होण्यासाठी त्यांच्या पंचम दिव्य रुप स्कंदमातेची पूजा सफेद रंगाचे कपेड घालून करा. या रंगामुळे मनाला शांती मिळते.

सहावा दिवस : 8 ऑक्टोबर, 2024

मंगळवारी 8 ऑक्टोबरला माता देवीचं सहावं दिव्य रुप कात्यायिनी मातेची पूजा लाल रंगाचे कपडे घालून करा. यामुळे जीवनात नवीन शक्ती आणि साहर निर्माण होईल. 

सातवा दिवस : 9 ऑक्टोबर, 2024

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 ऑक्टोबरला माता राणीचं सातवं रुप कालरात्री मातेची पूजा निळ्या रंगाचे कपडे घालून करा. यामुळे जीवनात समृद्धीसह शांतीही मिळते.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त 'हे' काम लगेच करा

आठवा दिवस : 10 ऑक्टोबर, 2024

गुरुवारी 10 ऑक्टोबरला गुलाबी रंगाचे कपडे घालून देवी मातेचं आठवं रुप महागौरी मातेची पूजा केल्यानं घरात सुख-समृद्धी येईल.

नववा दिवस : 11 ऑक्टोबर, 2024

नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी देवी मातेचं एक दिव्य रूप सिद्धीदात्री मातेची पूजा जांभळ्या रंगाचे कपडे घालून करा.
टीप - या लेखात दिलेली माहिती धार्मिक शास्त्राच्या मान्यतेनुसार आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

    follow whatsapp