Rule Changes From January 1 : नवीन वर्षासोबतच पर्सनल फायनान्स आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधीत अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत. 1 जानेवारी 2025 पासून असे अनेक नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि फायनान्सशियल प्लॅनिंगवर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतींपासून पेंशन आणि यूपीआयच्या सुविधांमधील नियमांचा समावेश आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
1) LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करते. यावेळी 1 जानेवारी 2025 ला सिलेंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. 14 किलोच्या घरेलू सिलेंडरची किंमत खूप काळापासून स्थिर होती. परंतु, कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालंय.
2) कारच्या किंमतीत वाढ
जर तुम्ही कार खरेदी करणार असाल, तर 1 जानेवारी पासून तुम्हाला जादाचे पैसे मोजावे लागतील. मारुती सुझूकी, ह्युंदाई, महिंद्रा, आणि बीएमडब्ल्यू कारच्या किंमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
3) रेशन कार्डसाठी ई-केवायसी आवश्यक
सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेले रेशन कार्ड 1 जानेवारी 2025 पासून रद्द केले जातील.
4) पेन्शनच्या नियमांमध्ये बदल
ईपीएफओने पेन्शन लाभार्थ्यांसाठी नियम सोपे केले आहेत. आता ते देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम काढू शकतात.
हे ही वाचा >> Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?
5) EPFO सदस्यांसाठी ATM ची सुविधा
सरकार EPFO च्या माध्यमातून रजिस्टर्ड कर्मचाऱ्यांसाठी एटीएम कार्ड सुविधा सुरु करण्याची योजना बनवत आहेत. यामध्ये कर्मचारी त्यांच्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतात.
6) फिचर फोन यूजर्ससाठी UPI लिमिटमध्ये वाढ
UPI 123Pay सेवेच्या माध्यमातून फिचर फोन यूजर्स आता 10 हजार रुपये भरू शकतात. याआधी याचं लिमिट 5 हजार रुपये होते.
7) फिक्स्ड डिपॉजिटचे नवे नियम
RBI ने NBFCs आणि HFCs साठी फिक्स्ड डिपॉजिटशी जोडलेल्या नव्या नियमांमध्ये बदल केला आहे. हे नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
8) अमेरिका व्हिसा नियमांमध्ये बदल
भारतात अमेरिकी दुतावास 1 जानेवारी 2025 पासून नॉन इमिग्रेंट व्हिसासाठी एकदा अपॉइंटमेंट री-शेड्युल करण्याची सुविधा मिळेल. यानंतर रिशेड्युल केल्यावर शुल्क लागेल.
हे ही वाचा >> 31st December 2024 Gold Rate : ग्राहकांनो! थर्टी फर्स्टला करा धमाल; सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, आजचे दर वाचाच
9) सेन्सेक्स आणि बँकिंग डेरिवेटिव्ह कॉन्ट्रॅक्टच्या नव्या तारखा
बीएसईने घोषणा केली आहे की, 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स आणि बँकेक्सचे साप्ताहिक कान्ट्रॅक्ट प्रत्येक मंगळवारी समाप्त होतील. जे शुक्रवारी संपायचे.
10) जानेवारीत एकूण 15 दिवस बँका बंद राहतील
जानेवारीत एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दूसरा आणि चौथा शनिवारशिवाय उत्सवातील सुट्ट्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आरबीआयची अधिकृत सुट्ट्यांची सूची अजूनही घोषित केली नाहीय.
ADVERTISEMENT
