Optical Illusion : मांजर पाळणं सोपं पण शोधणं कठीण! गरुडासारखी नजर असणाऱ्यांनाच दिसेल फोटोत लपलेली मांजर

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून अनेकांना घाम फुटतो. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं तगडं आव्हान लोकांपुढे असतं.

Trending Optical Illusion

Trending Optical Illusion

मुंबई तक

• 08:08 PM • 31 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा लेटेस्ट फोटो पाहिलात का?

point

कोण कोण शोधून दाखवणार फोटोत लपलेली मांजर?

point

...तरच तुम्हाला शोधता येईल या फोटोत लपलेली मांजर

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून अनेकांना घाम फुटतो. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं तगडं आव्हान लोकांपुढे असतं. अशाच प्रकारचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. कारण एका प्राचीन वास्तूमध्ये एक मांजर लपली आहे. ही मांजर शोधण्यात भल्या भल्यांना अपयश आलं आहे. पण ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, ती माणसं या प्राचीन वास्तूमध्ये लपलेली मांजर सहज शोधू शकतात. पण ही मांजर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा वेळ असणार आहे. 

हे वाचलं का?

या प्राचीन वास्तूचा फोटो पाहिल्यावर खूप लोक गोंधळून गेले असतील, कारण ही मांजर शोधणं खूपच कठीण आहे.या मांजरीला शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागेल. फोटोकडे नीट पाहिल्यावर एक मोठी प्राचीन वास्तू दिसते. या वास्तूला मोठ्या भीतींचं बांधकाम केल्याचं दिसंतय. उंच अशा या वास्तूमध्ये एक मांजर हरवली आहे. ही मांजर शोधण्यासाठी तुम्हाला दहा सेकंदांचा वेळ दिला गेला आहे. या वेळेत तुम्हाला फोटोत लपलेली मांजर शोधायची आहे. 

हे ही वाचा >> Kitchen Tips : आलं-लसूण फ्रेश ठेवायचंय? फक्त 'या' ट्रिक्स वापरा; अनेक दिवस होणार नाही खराब

ज्या लोकांनी तल्लख बुद्धीचा वापर करून या फोटोत लपलेली मांजर शोधलीय, त्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, असं नक्कीच म्हणता येईल. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेली मांजर शोधता आली नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत, या फोटोत मांजर नेमकी कुठे लपली आहे ते..तुम्ही जर खूप बारकाईने या फोटोला पाहिलं तर तुम्हाला भींतीच्या मधोमध एका मोठ्या काळ्या छिद्रात लपलेली मांजर पाहू शकता. खूप प्रयत्न करूनही तुम्हाला मांजर दिसली नसेल, तर टेन्शन घ्यायची काहीच आवश्यकता नाही. कारण खाली दिलेल्या फोटोत ज्या ठिकाणी मांजर लपली आहे, त्या ठिकाणी रेड सर्कलमध्ये ही मांजर दाखवण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> Bank Holidays in January 2025: 1 जानेवारी 2025 ला बँक आणि शेअर मार्केट राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एकदा वाचा

    follow whatsapp