Optical Illusion: 'चिते की चाल बाज की नजर'; Video मध्ये लपलाय खरा बिबट्या! 10 सेकंदात शोधाल तर...

मुंबई तक

• 05:49 PM • 03 Oct 2024

Optical Illusion Video : सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजनमध्ये दडलेलं कोडं सोडवण्यासाठी चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजरेची गरज असते.

Mumbaitak
follow google news

Optical Illusion Video : सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजनमध्ये दडलेलं कोडं सोडवण्यासाठी चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजरेची गरज असते. अनेकवेळा उत्तर डोळ्यासमोर असूनही काहीजण यामध्ये फसतात. अशी चित्रे कधी कधी मनाला थक्क करून सोडतात. खरं तर, ऑप्टिकल इल्यूजनमुळे अनेक प्रकारे गोष्टी पाहण्याची क्षमता वाढते आणि मन देखील तीक्ष्ण होते. यासोबतच आत्मविश्वासही वाढतो. अलीकडे असाच एक ऑप्टिकल इल्युजन व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये एक हिम बिबट्या दडलेला शोधायचा आहे. ज्यासाठी 10 सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. (Optical Illusion instagram video can you find leopard in this video in 10 seconds then find it now)

हे वाचलं का?

तुम्हाला काही दिसलं का?

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला हा मनोरंजक ऑप्टिकल इल्युजन व्हिडीओ ब्रिटनमधील फाइव्ह सिस्टर्स झूने शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिम बिबट्याला शोधायचं आहे, ज्यासाठी फक्त 10 सेकंद देण्यात आले आहेत. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये, बिबट्याचा रंग आणि नमुना ज्या नैसर्गिक वातावरणात तो लपलेला आहे त्याच्याशी पूर्णपणे जुळतो. हा फोटो केवळ आव्हानात्मकच नाही, तर प्रेक्षकांना एक मजेदार अनुभवही देतो. 

हेही वाचा : Gold Rate: 'सोन्याचे दर चमकतात कसे... लकालका लकालका'; नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुफान तेजी!

कुठे लपलाय बिबट्या?

यूकेमधील फाइव्ह सिस्टर्स झूने नुकताच एक इंस्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हिम बिबट्याला शोधण्याचे आव्हान दिले आहे. व्हिडीओची सुरुवात प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात हिम बिबट्याच्या खडकाळ निवासस्थानाच्या दृश्याने होते. पहिल्यांदा पाहिल्यावर हे अशक्य वाटते. तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही तुम्हाला बिबट्या दिसला नसेल तर काळजी करू नका. याचे उत्तरही व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Fivesisters.zoo नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत 1 लाख 26 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

    follow whatsapp