Ladki Bahin Yojana : तब्बल 1 कोटी 96 लाख महिलांच्या खात्यात 4500 जमा?, तुमच्या अर्जाचं काय झालं?

मुंबई तक

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 02:16 PM)

Ladki Bahin Yojana, Third Installment : आम्ही केवळ घोषणा करत नाही तर केलेल्या घोषणेची थेट अंमलबजावणी करतो. मला सांगण्यास अत्यानंद होतो आहे की, राज्यातील तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र महिला भगिनींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र माय माऊलींच्या खात्यातही तिसऱ्या टप्प्याचे पैसे लवकरात लवकर जमा होतील.

ladki bahin yojana scheme third installement deposite 1 crore 96 lakh people account mukhymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare

तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरण झाला

follow google news

बातम्या हायलाइट

point

1 कोटी 96 लाख महिलांना मिळाला तिसऱ्या टप्प्याचा लाभ

point

उर्वरीत महिलांना लवकरच मिळणार लाभ

point

2 कोटी महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरणाचे लक्ष्य

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. याबाबतची एक अधिकृत आकडेवारी देखील समोर आली आहे. त्यानुसार तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. या तिसऱ्या हप्त्यात काही महिलांच्या खात्यात 1500 तर काहींच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. असे असताना काही महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमाच झाला नाही. त्यामुळे या महिलांच नेमकं काय झालं आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme third installement deposite 1 crore 96 lakh people account mukhymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare) 

हे वाचलं का?

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून तिसऱ्या हप्त्यात नेमक्या किती महिलांना लाभ मिळाला आहे? याची माहिती दिली आहे. ''राज्यातील माझ्या लाडक्या बहिणी आणि माय माऊलींसाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी ! आम्ही केवळ घोषणा करत नाही तर केलेल्या घोषणेची थेट अंमलबजावणी करतो. मला सांगण्यास अत्यानंद होतो आहे की, राज्यातील तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र महिला भगिनींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे.  उर्वरित पात्र माय माऊलींच्या खात्यातही तिसऱ्या टप्प्याचे पैसे लवकरात लवकर जमा होतील.

हे ही वाचा : पुण्यात टोळक्यांचा थरार! IT इंजिनिअरच्या कुटुंबाचा 40 जणांकडून जीवघेणा पाठलाग, CCTV मध्ये कैद

 माझी लाडकी बहीण योजना ही जवळपास 2 कोटी महिला भगिनींच्या खात्यात लाभ हस्तांतरणाची राज्यातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक योजना आहे. या ऐतिहासिक योजनेपासून माझी एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही याची खात्री राज्याचा अर्थमंत्री आणि तुमचा दादा म्हणून मी देत आहे. माझ्या बहिणींना आणि माय माऊलींना लाभ आणि बळ देण्यासाठी आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे. 

'त्या' महिलांच काय होणार? 

ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसऱ्या टप्प्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले नाही आहेत. त्या महिलांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात पैसे हस्तांतरणाचे काम सूरूच आहे. त्यामुळे थोडा उशीराने तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तुमचा जर अर्ज मंजूर असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

दरम्यान तरी जर तुम्हाला पैसे खात्यात जमा होण्याचा संशय येत असे तर सरकारने या सर्दभातली हेल्पलाईन सूरू केली आहे. या हेल्पलाईनवर तुम्ही तक्रार करू शकता. तसेच ज्या व्यक्तीने तुमचा अर्ज मंजूर केला आहे. त्याकडे देखील तुम्ही याबाबतची विचारणा करू शकता. 

    follow whatsapp