Optical Illusion IQ Test : मेंदूला चक्रावून टाकणारे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. हे फोटो डोळ्यांना चकवा देत अनेकांचा गोंधळ उडवतात. पण काही फोटोंमध्ये मेंदुला चालना देणारा कंटेट लिहिलेला असतो. या फोटोंकडे पाहिल्यावर तुमचाही गोंधळ उडत असेल. पण हे फोटो खूप कठीणही नसतात. कारण त्यांच्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त बुद्धीचा कस लावायचा आहे. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा भन्नाट फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. (Pictures of optical illusion that shock the brain often go viral on social media. These pictures dodge the eyes and confuse many)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत 'बाज' लिहिलेलं आहे. पण या फोटोत 'राज' सुद्धा लिहिलं आहे. पण ते शोधणं तितकं सोपंही नाही. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, तीच माणसं फोटोत लपलेला राज शब्द शोधू शकतात. तुम्हालाही ऑप्टिकल इल्यूजनची ही टेस्ट खूप कठीण वाटू शकते. कारण या फोटोत असलेला राज शब्द तुम्हाला फक्त 10 सेकंदातच शोधायचा आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! दिवाळी करा दणक्यात साजरी, सरकारने दिली खूशखबर
ज्या लोकांना फोटोत लपलेला राज शब्द दिसला असेल, त्या सर्वाचं अभिनंदन. पण ज्यांना या फोटोत फक्त बाज शब्दच दिसलाय, त्यांना तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोला तीक्ष्ण नजरेनं पाहिलं तर तुम्हाला फोटोत असलेला राज शब्द सहज शोधता येईल. तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी झाला, तर तुम्हालाही तुमच्याकडे असलेल्या आयक्यू लेव्हलची क्षमता समजेल.
सततच्या कामकाजामुळं वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. ऑप्टिकलच्या सर्वच फोटो खूप इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक जण बुद्धीचा वापर करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कारण फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असतं.
ADVERTISEMENT