Relationship Goals : प्रेम हे प्रेम असतं... ते कधीही, कुठेही आणि कोणालाही होऊ शकतं. पण, प्रेमात कोणीही पडलं तरी ते व्यक्त मात्र मुलंच करतात. काही क्वचितच मुली असतात ज्या आपलं प्रेम व्यक्त करण्यात डगमगत नाहीत. पण याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, की असं का घडतं? मुली स्वत:हून पहिल्यांदा प्रपोज करणं का टाळतात? चला मग याविषयी जाणून घेऊया. (Relationship Goals Why do boys always propose first Why don't girls express their love feeling)
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला हळूहळू मुलींनीही प्रपोज करायला सुरुवात केली आहे पण असे करण्यापूर्वी त्या हजार वेळा विचार करतात. ही जबाबदारी फक्त मुलांनी घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. त्यांना पहिल्यांदा आपलं प्रेम व्यक्त करायचं नसतं…
हेही वाचा : Gold Price Today in your city : दिवाळीआधीच सोनं 80 हजार पार? चांदी तर लाखोंच्या घरात!
स्वत:हून प्रपोज करताना मुलींचं कुठे अडतं?
रिलेशनमध्ये प्रत्येकाला रिजेक्शनची भीती असते आणि मुलींना कधीच कोणाच्या रिजेक्शनचा सामना करायचा नसतो. प्रेमातला नकार मुलींसाठी धक्क्यापेक्षा कमी नसतो. त्यांना यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो. जर मुलांनी त्यांना रिजेक्ट केलं तर त्यांचा आत्मविश्वास डगमगू शकतो.
ब्रेकअप होण्याची भीती
असं म्हटलं जातं की, मुली आधी एखाद्या मुलाला प्रपोज करणं टाळतात कारण त्यांना नेहमी भीती असते की मुलगा असं केल्याने तुमचा आदर करणार नाही. तो त्यांना प्रत्येक मुद्द्यावर सोडून जाण्याची धमकी देत राहील, ज्यामुळे त्यांचे मन दुखावेल. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांना ब्रेकअप होण्याचीही मुलींना भीती असते.
हेही वाचा : Govt Job : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती! मिळणार भरघोस पगार...
मुलांकडून असतात 'या' अपेक्षा
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की मुलींना मुलांपेक्षा डेटवर जाणे जास्त आवडते. या कारणामुळे मुली कोणत्याही मुलाला आधी प्रपोज करत नाहीत. कारण मुलींना नेहमी असं वाटतं की मुलांनी त्यांना स्पेशल ट्रीट करावं. त्यांना चांगलं वाटेल असं वागावं आणि छान-छान गिफ्ट द्यावेत, म्हणूनच त्या सर्वात आधी प्रेम व्यक्त करणे टाळतात.
ADVERTISEMENT