जगात नवरा-बायकोचं नातं हे बिनधास्त आणि मैत्रिपूर्ण असू शकतं. चाणक्य नितीनुसार, नवरा-बायकोमध्ये तीन गोष्टींबाबत कधीही संकोच नसावा.
ADVERTISEMENT
जर नवरा-बायकोमध्ये या तीन गोष्टींबद्दल कोणताही संकोच नसेल तर नाते नेहमी सुखी-समाधानी आणि आनंदी राहते.
नवरा-बायकोने एकमेकांवर हक्क दाखवण्यात कधीही कोणताही संकोच करू नये.
आचार्य चाणक्य यांनी असं म्हटलं आहे की, एकमेकांवर अधिकार दाखवल्याने नाते केवळ सुधारत नाही तर नेहमी मजबूत राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना कधीही लाजू नये.
एकमेकांवर प्रेम व्यक्त करू न शकणाऱ्या आणि संकोच करणाऱ्या पती-पत्नीमधील नाते कमकुवत बनते.
पती-पत्नीमध्ये एकमेकांना नाराज करणारी एखादी गोष्ट असेल तर त्यांनी ती सांगण्यास अजिबात संकोच करू नये.
एकमेकांशी कोणत्याही गोष्टीवर बोलून नाती जपली जातात. मतभेद फार काळ टिकत नाहीत.
ADVERTISEMENT